Investment fixed deposit tax rules  file photo
अर्थभान

Investment Tips: पहिल्यांदाच FD मध्ये गुंतवणूक करत असला तर सावधान! टॅक्सचे नियम जाणून घ्या

fixed deposit tax rules: FD मध्ये गुंतवणूक करताना, विशेषतः पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांनी, आयकर संबंधित नियम काळजीपूर्वक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मोहन कारंडे

Investment fixed deposit tax rules

नवी दिल्ली : भारतीय गुंतवणूकदारांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा नेहमीच सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारा पर्याय मानला जातो. यात कमी वेळेत चांगले व्याज आणि आवश्यकतेनुसार पैसे काढण्याची सोय मिळते. मात्र, FD मध्ये गुंतवणूक करताना, विशेषतः पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांनी, आयकर संबंधित नियम काळजीपूर्वक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते आणि तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते.

एफडीचे नियम प्रत्येक बँकेत थोडेसे बदलतात, परंतु बहुतेक बँकांमध्ये किमान ठेव रक्कम १,००० ते १०,००० दरम्यान असते. एफडीचा कालावधी ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंत असू शकतो. जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी एफडी मोडली तर बँका सामान्यतः दंड आकारतात किंवा कमी व्याजदर आकारतात. व्याजदर बँक आणि ठेव कालावधीवर अवलंबून असतात. ज्येष्ठ नागरिकांना सामान्यतः इतर ग्राहकांपेक्षा जास्त व्याजदर दिले जातात, ज्यामुळे निवृत्त व्यक्तींसाठी एफडी हा एक चांगला पर्याय बनतो.

व्याजावर लागतो टॅक्स

FD मधून मिळणारे व्याज तुमच्या उत्पन्न कर स्लॅबनुसार करपात्र असते. जर तुमचे व्याजाचे उत्पन्न वर्षाला 40,000 (ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000) पेक्षा जास्त असेल, तर बँक TDS कापते. जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल, तर टॅक्स सेव्हिंग FD एक चांगला पर्याय असू शकतो. यात गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळते.

एफडीमध्ये फॉर्म १५ जी/१५ एच

जर FD गुंतवणूकदाराचे उत्पन्न आयकर स्लॅबपेक्षा कमी असेल, तर त्यांच्यासाठी आवश्यक आहे की त्यांनी व्याज कापले जाण्यापूर्वीच बँकेत जाऊन Form 15G/15H जमा करावे. हे फॉर्म भरल्यास TDS कापला जात नाही. येथे Form 15G हा 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांसाठी असतो. तर Form 15H हा ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी असतो.

PAN लिंक नसल्यास TDS वाढतो

जर FD खात्यात PAN कार्ड अपडेट केलेले नसेल, तर बँक TDS चा दर 10% वरून 20% पर्यंत वाढवते. हा नियम आयकर कायद्याच्या कलम 194A अंतर्गत लागू होतो. त्यामुळे, FD करण्यापूर्वी बँकेत PAN अपडेट नक्की करा.

ITR मध्ये FD मधून झालेले उत्पन्न दाखवणे आवश्यक

ITR भरताना, FD द्वारे झालेल्या कमाईची माहिती आयकर विभागाला देणे आवश्यक आहे. अनेक लोक असा विचार करतात की TDS कापला गेला आहे, म्हणून आता व्याज दाखवण्याची गरज नाही; पण हे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत, ITR मध्ये FD व्याजाच्या कमाईची माहिती कधीही लपवू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT