Fake Currency: गुजरातच्या अहमदाबाद क्राईम ब्रांचने नकली नोटांचे एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. पोलिसांनी तब्बल २.३८ कोटी रूपयांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेसह सात आरोपींना अटक केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की या आरोपींनी चॅट जीपीट (ChatGPT AI) आणि चीनमधून मागवण्यात आलेल्या सिक्युरिटी थ्रेड पेपरचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे ५०० रूपयांच्या उच्च दर्जाच्या नकली नोटा छापण्यात आल्या.
नकली नोटी प्रकरणी अहमदाबाद क्राईम ब्रांचने एक पत्रकार परिषद घेतली होती. क्राईम ब्रांचचे डीसीपी अजित रायजान यांनी सांगितलं की १८ मार्च रोजी अहमदाबाद क्राईमला एक टीप मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी सात लोकं हाय क्वालिटी नकली भारतीय नोटांची तस्करी करत आहेत अशी माहिती मिळाली.
डीसीपी यांनी सांगितलं की तपासात असं दिसून आलं की या आरोपींनी चीनमधून उच्च गुणवत्तेचा कागद आणि इतर सामुग्री आयात केली होती. या आयातीसाठी देखील खोट्या नोटांचा वापर करण्यात आला होता. या हाय क्वालिटी कागदात आधीपासूनच काही सुरक्षा फिचर उपलब्ध होते.
नंतर तपासात असं लक्षात आलं की आरोपींनी उच्च प्रिटिंग गुणवत्ता मिळवण्यासाठी आपल्या इंडस्ट्रीय ग्रेड प्रिंटरला कॉन्फिगर करण्यासाठी चॅट जीपीटी आणि इतर AI टूल्सचा वापर केला होता.
क्राईम ब्रांचनं दिलेल्या माहितीनुसार या सात आरोपींची चौकशी सुरू असून पोलीस कोठडीची देखील मागणी करण्यात आली आहे. अट केलेल्या आरोपींमध्ये मुकेश थुम्मरची भूमिका महत्वाची होती. तपासात असं दिसून आलं आहे की तो गुजरातमध्येच सक्रीय होता. पोलिसांनी आरोपींना २.१ कोटी रूपयांपेक्षा जास्त नकली नोटांसोबत अटक केली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद क्राईम ब्रांचने सूरत पोलिसांच्या मदतीने सूरतमध्ये देखील शोध मोहीम राबवली. तिथून २८ लाख रूपये फेक करन्सी आणि प्रिंटिंग साधने, प्रिंटिंग मशिन जप्त करण्यात आले.
एजन्सीच्या मते या कारवाईनंतर देशातील वित्तीय व्यवस्थेला असलेला एक मोठा धोका टळला आहे. ही कारवाई एका मोठ्या सप्लाय नेटवर्कला उद्ध्वस्त करण्यास देखील महत्वाची ठरत आहे.
डिजीटल पेमेंटच्या काळात ऑनलाईन व्यवहार वेगाने वाढत आहेत. मात्र असं असंल तरी कॅश अर्थात नोटांचे महत्व कमी झालेले नाही. रोजच्या जगण्यात १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० रूपयांच्या नोटांचा वापर सर्वजण करत आहेत.