DCB Bank UPI cashback offer 2025 Pudhari
अर्थभान

UPI Cashback Offer: UPI पेमेंट करा आणि मिळवा 7,500 रुपये कॅशबॅक; बँकेची खास ऑफर जाणून घ्या

UPI Users Alert: UPI वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. डीसीबी बँकेने आपल्या हॅपी सेव्हिंग्स अकाउंट धारकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. ग्राहकांना वर्षभरात ₹7,500 पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

Rahul Shelke

DCB Bank’s Happy Savings Account Offers: जर तुम्ही रोजच्या व्यवहारांसाठी UPI पेमेंट वापरत असाल, तर डीसीबी बँक (DCB Bank) ची ही ऑफर तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते. खासगी क्षेत्रातील या बँकेने आपल्या हॅपी सेव्हिंग्स अकाउंट (Happy Savings Account) धारकांसाठी मोठी कॅशबॅक ऑफर आणली आहे. आता UPI द्वारे पैसे पाठवून तुम्ही वर्षभरात 7,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता.

कसा मिळेल कॅशबॅक?

बँकेच्या माहितीनुसार, हॅपी सेव्हिंग्स अकाउंटधारकांना दर महिन्याला जास्तीत जास्त ₹625 पर्यंत आणि वर्षभरात ₹7,500 पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. यासाठी सर्वात आधी तुम्हाला DCB बँकेत Happy Savings Account उघडावं लागेल. नंतर जेव्हा तुम्ही UPI द्वारे पैसे पाठवाल (डेबिट ट्रान्झॅक्शन), तेव्हा बँक दर तीन महिन्यांनी (प्रत्येक तिमाहीत) तुमच्या खात्यात कॅशबॅक जमा करेल.

खात्याच्या अटी आणि फायदे

  • खात्यात दर महिन्याला किमान ₹10,000 अॅव्हरेज मंथली बॅलन्स (AMB) ठेवणे आवश्यक आहे.

  • कॅशबॅक मिळवण्यासाठी तुमच्या खात्याचा ₹25,000 एवरेज क्वार्टरली बॅलन्स (AQB) असावा.

  • प्रत्येक UPI ट्रान्झॅक्शनची किमान रक्कम ₹500 असावी.

  • ग्राहकांना RTGS, NEFT आणि IMPS ट्रान्झॅक्शन मोफत मिळतील.

  • तसेच, DCB बँकेच्या कोणत्याही ATM वरून अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शन करण्याची सोयही दिली आहे.

UPIच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलवरून कोणत्याही वेळी लगेच पैसे पाठवू किंवा स्वीकारू शकता. ही सिस्टीम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) विकसित केली आहे.
UPI तुमचं बँक खाते Google Pay, PhonePe, Paytm, BHIM यांसारख्या अॅप्सशी जोडतं.

प्रत्येक ग्राहकाला एक UPI ID किंवा QR कोड मिळतो, ज्याच्या मदतीने तुम्ही पैसे पाठवू शकता. उदा. जर तुम्हाला कोणाला ₹500 पाठवायचे असतील, तर संबंधित व्यक्तीचा UPI ID टाका, रक्कम लिहा, UPI PIN टाका आणि पैसे लगेच ट्रान्सफर होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT