LPG Cylinder Price  Pudhari
अर्थभान

LPG Cylinder Price: सलग दुसऱ्या महिन्यात कमर्शियल गॅस सिलेंडर झाला स्वस्त; दर किती कमी झाले?

Commercial LPG Cylinder Price Cut: देशात 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात 10 ते 10.5 रुपयांची घट झाली आहे. मात्र घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही.

Rahul Shelke

Commercial LPG Cylinder Price Cut Again: देशातील कमर्शियल वापरासाठी असलेल्या 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यातही घसरण झाली आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि इतर महानगरांमध्ये 1 डिसेंबरपासून या सिलेंडरचे दर 10 ते 10.5 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. हॉटेल व्यवसाय, फूड इंडस्ट्री आणि इतर व्यावसायिक क्षेत्रासाठी हा दिलासा मानला जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे आणि नैसर्गिक गॅसचे दर खाली आले असले तरी, भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण होत आहे. त्यामुळे किंमती कमी करता येत नाहीत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आगामी काळात डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला तर याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो.

शहरानुसार नवे दर

IOCL च्या आकडेवारीनुसार 19 किलो कमर्शियल सिलेंडरचे दर आता—

  • दिल्ली: ₹1,580.50

  • कोलकाता: ₹1,684

  • मुंबई: ₹1,531.50

  • पुणे: ₹1,531.50

  • चेन्नई: ₹1,739.50

गेल्या महिन्यातही सिलेंडरचे दर कमी झाले होते. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांसाठी हा सलग दुसरा दिलासा आहे.

घरगुती LPG सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एप्रिल महिन्यात शेवटचा बदल झाला होता, जेव्हा सरकारने घरगुती सिलेंडरवर ₹50 वाढ केली होती. त्यानंतर घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

घरगुती LPG सिलेंडरचे सध्याचे दर

  • दिल्ली: ₹853

  • कोलकाता: ₹879

  • मुंबई: ₹852.50

  • पुणे: ₹852.50

  • चेन्नई: ₹868.50

ग्राहकांना घरगुती सिलेंडरच्या किंमतीत सवलतीची अपेक्षा असली तरी सध्या तरी त्यात काहीही बदल होण्याची चिन्हे नाहीत. तज्ज्ञांचे मत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिरता आणि रुपयाचे मूल्य सावरले तर घरगुती सिलेंडरच्या दरातही आगामी महिन्यांत सवलत मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT