DA Hike pudhari
अर्थभान

DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा काही संपेना... महागाई भत्ता वाढीसाठी अजून वाट पाहावी लागणार

सरकारकडून ऑक्टोबर महिन्यात देखील कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढीसाठी अजून वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

Anirudha Sankpal

DA Hike : केंद्रीय कर्मचारी हे जुलै २०२६ पासून महागाई भत्ता वाढीसाठी वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या आधी ही वाढ होईल अशी आशा कर्मचारी अन् संघटनांना होती. मात्र सरकारकडून ऑक्टोबर महिन्यात देखील कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढीसाठी अजून वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

महागाईचा आकडे पाहता यंदा महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. जर असं झालं तर सध्याचा महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांवर जाईल. मात्र याबाबत अजून सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

ऑक्टोबरमध्ये घोषणा नाही

केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आशा होती की सरकार ऑक्टोबरमध्ये महागाई भत्ता वाढवण्याबाबत निर्णय घेईल. १४ ऑक्टोबरला कॅबिनेटची बैठक झाली होती. त्यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स लिंक्ड बोनस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र महागाई भत्ता वाढीबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.

दसऱ्याच्या आधी देखील सरकारने कोणती घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांना २१ ऑक्टोबरच्या कॅबिनेट बैठकीत याबाबत घोषणा होईल अशी भाबडी आशा होती. मात्र त्या दिवशी देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खिशात काहीही पडलं नाही. आता वाट पाहण्यापलीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांकडे दुसरा कोणता पर्याय नाही.

कर्मचाऱ्यांनी केले प्रदर्शन

महागाई भत्ता वाढीची घोषणा होण्यास विलंब होत आहे यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रमुख संघटना कॉन्फिडरेशन ऑफ सेंट्रेल गव्हर्नमेंट एप्लॉईज अँड वर्कर्सने १६ ऑक्टोबर रोजी कार्यालयात लंच टाईममध्ये प्रदर्शन करून आपली नाराजी व्यक्त केली.

कर्मचाऱ्यांनी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठीची १ जुलै २०२६ ला लागू होणारी महागाई भत्ता वाढ आणि महागाई दिलासा भत्ता याचा हप्ता लवकर घोषित करावा अशी मागणी केली. त्याचबरोबर आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या बोनसची घोषणा देखील करण्याची मागणी केली होती. सरकारने बोनसची घोषणा केली. मात्र महागाई भत्त्यावर कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांकडे वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT