8th Pay Commission Fitment Factor: महागाई सतत वाढतेय... सरकारी कर्मचाऱ्यांनी 'आकडा' समोर ठेवत आयोगाकडे केली 'खास' मागणी

फिटमेंट फॅक्टर एक गुणक आहे. हा गुणक जुन्या मूळ वेतनावर लागू करून नवी बेसिक सॅलरी निश्चित केली जाते.
8th Pay Commission Fitment Factor
8th Pay Commission Fitment Factorpudhari
Published on: 
Updated on: 

8th Pay Commission Fitment Factor: जेव्हापासून केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. तेव्हापासून प्रत्येक दिवशी आठव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर, बेसिक पगार, डीआर, डीए आणि पेन्शन याबाबत बातम्या होत आहेत. अनेक सरकारी कर्मचारी संघटनांनी वाढच्या महागाईवर बोट ठेवत कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी मोठ्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे.

8th Pay Commission Fitment Factor
8th Pay Commission Update: २.०, २.१५, २.२८ की २.५७ कोणता फिटमेंट फॅक्टर 'बेसिक' पगार लाखात घेऊन जाणार? जाणून घ्या संपर्ण गणित

कशी वाढली महागाई

केंद्रीय कर्मचारी संघटनांनी सांगतलेल्या माहितीनुसार जुलै २०२३ मध्ये डीए अर्थात महागाई भत्ता हा ४६ टक्के होता. जानेवारी २०२६ मध्ये तो वाढून ६० टक्के झाला आहे. मधे मधे महागाई 50%, 53%, 55% आणि 58% वर गेली. यावरून महागाई सतत वाढत आहे हे दिसून येते. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या खिशावर ताण पडत आहे.

फिटमेंट फॅक्टर काय असतो?

फिटमेंट फॅक्टर एक गुणक आहे. हा गुणक जुन्या मूळ वेतनावर लागू करून नवी बेसिक सॅलरी निश्चित केली जाते. ७ व्या वेतन आयोगाने हा फिटमेंट फॅक्टर २.५७ ठेवली होती. तर सहाव्या वेतन आयोगात १.८६ फिटमेंट फॅक्टर होता. यावेळी अनेक केंद्रीय कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर अजून वाढवण्याची मागणी केली आहे.

8th Pay Commission Fitment Factor
8th Pay Commission : कोरोना काळातील रोखलेला 'डीए' अखेर खात्यात जमा होणार? : 8व्या वेतन आयोगाकडून मोठ्या निर्णयाची शक्यता

मागणी कितीची आहे?

भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ (BPMS) यांनी ४ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. तर नॅशलन काऊंसील - JCM (NCJCM) आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन (AIDEF) यांनी ३.८३३ च्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे.

स्टाफ साईड फिटमेंट फॅक्टर ३.८३३ आणि किमान मूळ वेतन हे ६९,००० हजार रूपये करण्याची मागणी केली आहे. भारत पेंशनर्स समाजने देखील ३.८३ फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव ठेवला आहे.

डीए आणि डीआर बेसिक पगारात समाविष्ट करा

कर्मचारी संघटनांनी फक्त फिटमेंट फॅक्टर पुरत्याच मागण्या केलेल्या नाहीत. एफएनपीओ ने एक कायमची पे रिव्ह्यू बॉडी तयार करण्याचे देखील सुचवले असून त्याचे काम ज्यावेळी डीए ५० टक्क्याच्या पुढे जाईल त्यावेळी ९० दिवसात सुधारित फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली जाईल. त्याचबरोबर डीए आणि डीआर २५ टक्क्याच्या वर गेल्यानंतर तो मूळ वेतनात समाविष्ट करण्यात यावा अशी देखील चर्चा सुरू आहे.

8th Pay Commission Fitment Factor
8th Pay Commission Update: आठवा वेतन आयोग... केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनर्ससाठी 'ऑक्टोबर' महिना असणार महत्वाचा

अंतिम अहवालाची प्रतिक्षा

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स आता ८ व्या वेतन आयोगाच्या अंतिम अहवालाची प्रतिक्षा करत आहेत. आशा आहे की हा अहवाल मे- जून २०२७ पर्यंत सरकारकडे सुपूर्द केला जाण्याची शक्यता आहे. यानंतर यावर केंद्र सरकार अंतिम निर्णय घेईल. सध्या तरी या सर्व गोष्टी मागण्या आणि शिफारसी या पातळवीरच आहेत. खरी आनंदवर्ता ही ज्यावेळी आठवा वेतन आयोग आपला रिपोर्ट देणार आणि तो सरकार मंजूर करणार त्यानंतरच मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news