Reliance CEO Arrest pudhari
अर्थभान

Reliance CEO Arrest: सीबीआयने रिलायन्सच्या दोन माजी CEO ना केली अटक; एकाचा ४०९७ तर दुसऱ्याचा ३५२६ कोटी रूपयांशी आहे संबंध

Anirudha Sankpal

Reliance CEO Arrest: सीबीआयने रिलायन्स कमर्शिअल फायनान्स लिमिटेडचे माजी सीईओ आणि संचालक देवांग मूडी आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड चे माजी सीईओ आणि कार्यकारी संचालक रविंद्र सुधाळकर यांना अटक केली आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स कमर्शिअल फायनान्स प्रकरण हे १३ सार्वजनिक बँकांच्या ४०९७ कोटी रूपयांच्या लॉस संदर्भात आहे तर रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे प्रकरण हे १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ३५२६ कोटी रूपये लॉसचे आहे.

सीबीआयच्या वक्तव्यात म्हटले आहे की, 'गुंतवणूकदारांनी सांगितलं की देवांग मूडी हे रिलायन्सचे सीईओ असताना एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत सर्व महत्वाचे निर्णय घेत होते. त्यांनी मध्यस्थी कंपन्यांना आरबीआयच्या गाईडलाईनच्या विरूद्ध जाऊन कर्ज दिलीत.' सीबीआयने या प्रकरणी दोन कंपन्यांच्या माजी सीईओंना अटक केली आहे.

सीबीआयने पुढे सांगितलं की तपासात असं देखील उघड झालं आहे की या दोन आरोपींनी आरसीएफएल आणि आरएचएफएलचे फंड रिलायन्स एडीए ग्रुप कंपन्यांकडे वळवले. यात रिलायन्स कॅपिटल्स लिमिटेडचा देखील समावेश आहे. तसेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि रिलायन्स पॉवर या कंपन्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे एकूण ७ हजार ६२३ कोटी रूपयांचा तोटा कर्ज देणाऱ्या बँकांना झाला आहे.'

दरम्यान, ही बातमी हिंदुस्थान टाईम्सने दिली असून त्यांच्या प्रतिनिधिंनी रिलायन्स ग्रुपशी याबाबत त्यांचे मत जाणून घेण्यासाठी संपर्क केला असून त्यांचे म्हणणे अजून समोर आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT