Fraud Case: सव्वातीन कोटींच्या फसवणुकीसह खंडणीप्रकरणी आरोपीस अटक

अटक आरोपींची संख्या 3, इतर आरोपींचा शोध सुरू
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

मुंबई: सव्वातीन कोटीच्या फसवणुकीसह खंडणीप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस विमानतळ पोलिसांनी अटक केली. चेतन संघवी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी याच गुन्ह्यांत उमेशकुमार सरोवर ऊर्फ उमेशकुमार सुमन ऊर्फ सुबोध रंजन आणि रुपेशकुमार श्रीवास्तव या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. चेतनच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या तीन झाली असून इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Fraud Case
Fuel Price Hike: महागाईचा डबल झटका! इंधनानंतर आता दूध, तेल, भाज्या, डाळींसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले

यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्यांना ब्रोकर म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मीनारायण, देवकुमार, सुशील आणि चेतन यांनी आर्कशिप ग्रुपमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी कंपनीत एक कोटीची गुंतवणुक केली होती.

मात्र ही रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा न होता दुसऱ्या बँक खात्यात जमा झाली होती, त्याचा जाब विचारण्यासाठी ते आरोपींना भेटण्यासाठी एअरपोर्टच्या सहारा स्टार हॉटेलमध्ये गेले होते. तिथे त्यांना उमेशकुमार व त्याच्या पंधरा सहकाऱ्यांनी त्यांच्यासह त्यांचा महाव्यवस्थापकाला बेदम मारहाण केली होती.

Fraud Case
POCSO Case: पॉक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता; पीडित मुलीच्या लग्नानंतर आई बनली फितूर

जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे तीन कोटीची खंडणीची मागणी केली होती. सव्वादोन कोटी रुपये ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. या प्रकारामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती.

त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लक्ष्मीनारायण अग्रवाल, देवकुमार राय, सुशीलकुमार यादव, चेतन संघवी रामशिषकुमार गुप्ता ऊर्फ कुमार सर, उमेशकुमार सुमन ऊर्फ सुबोध रंजन, साक्षीकुमारी ऊर्फ वर्षा, स्वाती आणि गोयल या नऊजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणे, गंभीर दुखापत करणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यांत नंतर उमेशकुमार आणि रुपेशकुमार या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून चेतनचा सहभाग उघडकीस येताच त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news