आयटी आणि एफएमसीजी क्षेत्र काबिज केल्यानंतर अजिम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात आता उतरण्याची शक्यता आहे. भारतातील अब्जाधीश व्यावसायिक तसेच विप्रो या भारतातील महत्त्वाच्या आयटी कंपनीचे प्रमुख अजिम प्रेमजी यांची गुंतवणुकीसंबंधीची प्रेमजी इन्व्हेस्ट नावाची कंपनी आहे. विविध उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याचे काम या कंपनीतर्फे केले जाते.
टीव्हीएस क्रेडिट, आयसीआयसीआय प्रू लाईक, एफएसएस यांसारख्या गैरबँकिंग वित्तसंबंधी कंपन्यांमध्ये प्रेमजींची गुंतवणूक आहे; परंतु लवकरच बँकिंग क्षेत्रातदेखील उतरण्याचे संकेत मिळत आहेत. बँक ऑफ बडोदाची उपशाखा असलेली उत्तराखंडस्थित नैनीताल बँक खरेदी करण्यासाठी प्रेमजी इन्व्हेस्ट प्रयत्नशील आहे. सध्या या बँकेचे मूल्य 800 कोटींच्या जवळपास असल्याचे विश्लेषकांचा अंदाज आहे. याचसंबंधी प्राथमिक बोलणी चालू असून, 51 टक्क्यांची हिस्सेदारी पहिल्या टप्प्यात विकली जाणार असल्याचे समजते.
हेही वाचा :