Akshaya Tritiya Gold buying file photo
अर्थभान

Akshaya Tritiya Gold buying: फक्त १,००० रुपयांत अक्षय तृतीयेला खरेदी करता शुद्ध सोने; पाहा कसे!

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुमचे बजेट १५ हजार नसले तरीही, अगदी १,००० ते ९,००० रुपयांत तुम्ही शुद्ध सोने खरेदी करू शकता.

मोहन कारंडे

Akshaya Tritiya Gold buying

मुंबई: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केलेली गुंतवणूक 'अक्षय' राहते, अशी धारणा आहे. मात्र, सध्या सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,००० रुपयांच्या पार गेल्याने मध्यमवर्गीयांसाठी सोने खरेदी करणे एक आव्हान बनले आहे. मात्र, तुमचे बजेट १५ हजार नसले तरीही, अगदी १,००० ते ९,००० रुपयांत तुम्ही शुद्ध सोने खरेदी करू शकता.

बजेट ११ हजार असल्यास काय खरेदी कराल?

जर तुमचे बजेट ९,००० ते १२,००० रुपयांच्या दरम्यान असेल, तर तुम्ही १८ कॅरेट सोन्याचा विचार करू शकता. १८ कॅरेट सोन्यात ७५% शुद्ध सोने असते आणि उर्वरित २५% इतर धातूंचे मिश्रण असते. त्यामुळे याचे दर २२ किंवा २४ कॅरेटच्या तुलनेत बरेच कमी असतात. ११,००० रुपयांच्या आसपास तुम्ही नाजूक नथ, कानातील लहान कुडी किंवा एखादे हलके पेंडंट सहज खरेदी करू शकता.

डिजिटल गोल्ड : केवळ १०० ते १,००० रुपयांत करा खरेदी

ज्यांना केवळ गुंतवणुकीसाठी किंवा मुहूर्तासाठी सोने घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी 'डिजिटल गोल्ड' हा उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार १००, ५०० किंवा ५,००० रुपयांचेही सोने खरेदी करू शकता. तुम्ही दिलेल्या रकमेइतके सोने तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा होते, जे पूर्णपणे सुरक्षित असते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी म्हणून हा एक चांगला मार्ग आहे.

जुन्या सोन्याचा आधार

जर तुम्हाला नवीन दागिन्यांची हौस असेल पण बजेट कमी असेल, तर घरात पडलेले जुने किंवा मोडके सोने हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी जुने सोने मोडून त्या बदल्यात नवीन डिझाइनचे दागिने बनवून घेता येतात. यामुळे तुम्हाला केवळ घडणावळ द्यावी लागेल आणि कमी खर्चात नवा दागिना तुमच्याकडे येईल. यंदा सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे नाराज न होता, या पर्यायांचा वापर करून तुम्हीही विनाकर्ज सोन्याची खरेदी करून सण साजरा करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT