8th Pay Commission: सातव्या वेतन आयोगाची १० वर्षाची कालमर्यादा डिसेंबर २०२५ मध्ये संपुष्टात आली आहे. केंद्र सरकारने त्याच्या आधी ८ व्या वेत आयोगाची स्थापना केली. केंद्र सरकारने या आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे.
आता त्यातील १२ महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला असून या काळात आयोगाने देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन कर्मचाऱ्यांशी निगडीत संघटनांकडून त्यांचे मत मागवले आहे. या संघटनांसोबतच्या बैठकीत फिटमेंट फॅक्टर, वार्षिक वाढ, फॅमिली पेन्शन, डीए या गोष्टीवर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या संघटना वेगवेगळी मागणी करत आहेत.
मिनिस्ट्रियल स्टाफ असोसिएशनने ३.६१ फिटमेंट फॅक्टर ठेवण्याची मा्गणी केली आहे तर NC-JCM कडून फिटमेंट फॅक्टर ३.८ ठेवण्याची मागणी समोर आली आहे. भारतीय प्रतीक्षा मजदूर संघाने हा फिटमेंट फॅक्टर थेट ४ करा अशी डिमांड केली आहे. जर संघटनांच्या या मागण्या आठव्या वेतन आयोगाला मान्य करायच्या झाल्या तर त्याचे कॅल्क्युलेशन कसे होणार अन् पगार किती वाढणार हे पाहुयात
जर बेसिक पगार २५ हजार असेल तर या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे पगार वाढून ९० हाजर २५० रूपये होईल. अन् जर मूळ पगार हा ३५ हजार रूपये असेल तर तो वाढून १ लाख २६ हजार रूपये होणार आहे. अन् जर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा ५० हजार रूपये असेल तर त्यांचा मूळ पगार हा १ लाख ८० हजार पर्यंत पोहचू शकतो.
जर फिटमेंट फॅक्टर ३.८३ झाला तर ५० हजार बेसिक पे असलेल्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार हा १ लाख ९१ हजारापर्यतं पोहचू शकतो. तर ३५ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १ लाख ३४ हजार १५५ रूपये होईल. तर २५ हजार मूळ पगार असला कर्मचारी ९५ हजार ८२५ रूपयांपर्यंत पोहचू शकतो.
या परिस्थितीत २५ हजार बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार हा १ लाखापर्यंत पोहचेल. तर ३५ हजार बेसिक पे असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार हा १ लाख ४० हजारापर्यंत पोहचेल. ५० हजार बेसिक पे असलेल्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार हा ४ फिटमेंट फॅक्टर नुसार २ लाखांपर्यंत पोहचू शकतो.
सातव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर २.५७ ठेवला होता. त्यावेळी बेसिक पे हा ७ हजारावरून वाढून १८ हजारापर्यंत पोहचला होता. आता आठव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर किती ठेवला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्याच्या घडीला आठव्या वेतन आयोगाने कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा कोणती घोषणा केली नसून सरकारकडे अजून त्यांनी आपला अहवाल सुपूर्द करायचा आहे. अहवाल सादर केल्यानंतर सरकारच त्याच्यावर अंतिम निर्णय घेणार आहे. आता जे आकडे समोर येत आहेत त्या विविध कर्मचारी संघटनांच्या मागणीवरून येत आहेत.