What Happens Inside Your Body During a Sneeze: शिंक येणं ही शरीराची नैसर्गिक क्रिया आहे. पण आपण कितीही प्रयत्न केला तरी शिंकताना डोळे उघडे राहत नाहीत. ते स्वाभाविकपणे बंद होतात. अनेकांना वाटतं की डोळे उघडे ठेवून शिंक दिली तर डोळे दुखतील किंवा काहीतरी घडू शकतं. पण यामध्ये कितपत तथ्य आहे? नेमकं विज्ञान काय सांगतं? यावर एक नजर टाकूया.
नाकात धूळ, प्रदूषण, बॅक्टेरिया किंवा कोणताही बाहेरील कण गेल्यावर शरीर त्याला बाहेर फेकून देण्यासाठी एकदम जोरात हवा बाहेर टाकतं. यालाच ‘sneeze reflex’ म्हणतात.
शिंकताना डोळे बंद होणं हा शरीराचा एक ‘protective reflex’ आहे. कारण शिंकताना लाखो सूक्ष्म कण, बॅक्टेरिया, लाळेचे थेंब जोरात बाहेर फेकले जातात. डोळे उघडे ठेवल्यास हे कण थेट डोळ्यांवर आदळू शकतात आणि संक्रमणाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शरीर आपोआप डोळे बंद करून घेतं.
शिंकताना डोळे उघडे ठेवले तर डोळे बाहेर येतात, हा फक्त एक गैरसमज आहे. विज्ञानानुसार, अशी कोणतीही घटना कधीच घडली नाही. शरीरातील घाण नाक-तोंडातून बाहेर जाते, डोळ्यांमधून नाही. त्यामुळे हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.
शिंक येण्यामागे चेहऱ्यावरील ‘ट्राइजेमिनल नर्व’ मोठी भूमिका बजावते. ही नस नाक, डोळे, जबडा आणि चेहऱ्याच्या संवेदना नियंत्रित करते. नाकात त्रास जाणवला की मेंदू शिंक देण्याचा सिग्नल देतो. तेव्हा हीच नस डोळे बंद करण्याचाही आदेश देते. म्हणूनच डोळे उघडे ठेवून शिंक देणं जवळपास अशक्य असतं.
होय. शिंक रोखल्याने नाक, कान आणि डोळ्यांवर अनावश्यक दबाव येतो. कधी कधी रक्तवाहिन्या फुटण्याचाही धोका असतो. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात, शिंक थांबवू नका; तिला नैसर्गिकरित्या बाहेर येऊ द्या.