

बीजिंग : जर एखादी व्यक्ती बर्याच लोकांसमोर शिंकली तर त्याच्या आजूबाजूला असलेले नागरिक अस्वस्थ होतात. शिंकण्याची प्रक्रिया ही श्वसनमार्ग स्वच्छ होण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे शिंकणे शरीरासाठी आवश्यकही आहे. कुणी दोन वेळा शिकंत तर कुणी पाच वेळा शिंकत; पण जर या शिंका सतत येत असतील तर नक्कीच काही तरी आरोग्य समस्या असल्याची शक्यता आहे. चीनमधील एक व्यक्ती गेल्या 20 वर्षांपासून सलग शिंकतोय. शियाओमा असे या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. यामागील कारण आता समोर आले आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, झियामोआ यांना गेल्या अनेक वर्षांपासून सर्दी आणि जास्त शिंका येण्याचा त्रास होता, परंतु गेल्या महिन्याभरात त्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. शाओमाने सुरुवातीला त्याच्या शिंका येण्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले. त्याने शिंका येण्यावर अनेक पारंपरिक पद्धतीने उपचार केले; मात्र त्यावर कोणताही परिणाम झाला नाही. गेल्या महिन्यापासून त्याचा त्रास सर्वाधिक वाढला. त्यामुळे शियाओमा हा त्याच्या शहराजवळील शियान गाओक्सिन रुग्णालयाकडे गेला. वैद्यकीय अहवालानुसार, त्याला अॅलर्जिक राइनाइटिस नावाचा आजार होता, शिवाय त्याच्या नाकात एक खेळण्यातील फासा अडकून होता. हा फासा पाहून डॉक्टर देखील हैराण झाले. यामुळे त्याला सतत शिंका व सर्दी होत असल्याचं निदान झाले. रुग्णालयातील ओटोलॅरिंगोलॉजिस्ट यांग रोंग यांनी अनुनासिक एंडोस्कोपी करून रुग्णाच्या नाकातून गेल्या 20 वर्षांपासून अडकलेला फासा काढला. ‘आम्ही त्याच्या नाकातून स्राव असलेला पांढरा काढला. यानंतर त्यात दोन सें.मी.चा फासा असल्याचे निदर्शनास आले. बराच वेळ नाकात अडकल्याने तो खराब झाला होता. यांग रोंग यांनी सांगितले की, नाकाच्या मार्गाच्या खालच्या भागात हा फासा अडकला होता. ज्यामुळे त्याला गेल्या 20 वर्षांपासून हा त्रास होत होता. मुलं लहान असताना पालकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं, असस डॉक्टरांनी सांगितले. अशा वस्तू नाकाच्या आतील भागात सहज जाऊ शकतात, त्यामुळे जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो.