Stress Management
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत ताण-तणाव (स्ट्रेस) हे सामान्य झाले आहे. काम, शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखताना अनेकदा मानसिक व शारीरिक तणाव वाढतो. स्ट्रेस पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी तो योग्य प्रकारे नियंत्रित करता येतो. यासाठी काही प्रभावी उपाय आहेत, जे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत समाविष्ट केल्यास तुम्ही अधिक आनंदी, शांत आणि स्ट्रेसमुक्त राहू शकता.
स्ट्रेस कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे व्यायाम. नियमित चालणे, धावणे, योगा, जिम किंवा एखादी फिजिकल अॅक्टिव्हिटी केल्याने शरीरात एंडॉर्फिन नावाचे हॉर्मोन तयार होते, जे तुमच्या मूडला फ्रेश ठेवतात व मानसिक ताण कमी करतात.
प्रत्येक दिवशी 10 ते 15 मिनिटे ध्यान किंवा योग केल्याने मन शांत राहते आणि स्ट्रेस दूर होतो. योगामुळे शारीरिक आणि मानसिक समतोल राखला जातो, ऊर्जा टिकून राहते आणि तुमचं एकंदर आरोग्य सुधारतं.
ज्यावेळी काम वेळेत पूर्ण होत नाही, तेव्हा स्ट्रेस वाढतो. म्हणूनच कामांची प्राधान्यक्रमानुसार यादी करा, छोटे-छोटे ब्रेक घ्या आणि कामाचे छोटे विभाग पाडून ते पूर्ण करा. यामुळे स्ट्रेस टाळता येतो.
नकारात्मक विचार टाळा आणि 'मी हे करू शकतो/शकते' अशी मानसिकता ठेवा. हे तुमच्या आत्मविश्वासाला चालना देतं.
तुमच्या मन:शांतीसाठी स्वतःसाठी वेळ देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आवडती पुस्तके वाचा, संगीत ऐका किंवा निवांतपणे विश्रांती घ्या. यामुळे तुम्ही ताजेतवाने होता आणि दिवसभराची मानसिक थकवा दूर होतो.
कधीही तणाव वाटल्यास जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा. कुटुंबीय आणि मित्रांच्या सहवासात वेळ घालवल्याने मानसिक आधार मिळतो आणि मन हलकं वाटतं.
स्ट्रेस कमी करण्यासाठी योग्य आहारही महत्त्वाचा आहे. जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फायबर्सयुक्त आहार घ्या. चहा, कॉफी आणि साखरेचं प्रमाण कमी करा कारण हे स्ट्रेस वाढवू शकतात.
स्ट्रेस ही आजच्या युगातील एक अपरिहार्य गोष्ट आहे, पण योग्य सवयी आणि सकारात्मक जीवनशैलीमुळे तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता. आजच या 7 उपायांचा आपल्या जीवनशैलीत समावेश करा आणि तणावमुक्त जीवनाचा अनुभव घ्या.