अपंग पाल्याची काळजी File Photo
आरोग्य

Child Care| अपंग पाल्याची काळजी

तुम्ही किंवा तुमची/चा पाल्य अपंग असेल, तर पुढे नोंदवलेल्या काही किमान गोष्टी जरूर करून पाहा. तुम्हाला आणि पाल्याला त्याचा नक्की उपयोग होईल.

पुढारी वृत्तसेवा

महत्वाचे नंबर पाठ कर किंवा लगेच डायल करता येतील असे ठेवा. आपल्याला कोणाबद्दल अगोदरच संशय येत असेल, तर आपल्या जवळच्या/विश्वासातल्या व्यक्तीला तुम्हाला जे वाटतंय ते सगळं आणि स्पष्ट सांगून ठेवा.

आपल्या विश्वासातील व्यक्तीसोबत राहा किंवा अशाच व्यक्तींना आपल्यासोबत राहू द्या. तुमच्यासोबत कोणी हिंसा करत असेल, तर मदतीसाठी आरडाओरडा करा. तुमच्यासोबत कोणतीही हिंसा/लैंगिक शोषण केलं गेलं असेल, तर विश्वासातील व्यक्तींना सांगा.

विश्वासातील व्यक्तीला सोबत घेऊन अशा हिंसा/शोषण करणाऱ्या व्यक्तीची पोलिस ठाण्याला जाऊन तक्रार करा किंवा १०० नंबरवर फोन करून कळवा. घरात आणि बाहेर जातानाही आपल्याला लागणाऱ्या गोष्टी नेहमी आपल्या जवळ ठेवा.

घरातील सोयी-सुविधा आपल्याला वापरायला सोप्या/सहज होतील अशा करा. (उदा. बाथरूम, टॉयलेट किंवा घरातील इतर रचना) शक्य/जमत असेल तेवढं स्वावलंबी राहा. मात्र, आवश्यक तेव्हा उपयोगी पडेल, अशी सपोर्ट सिस्टीमही तयार ठेवा आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी वेळेत जेवण करा आणि औषधं असतील, तर नियमित घ्या.

डॉक्टरांनी सांगितला असेल तसा व्यायामही करा. आपल्या आवडीच्या गोष्टीत मन रमवा. छंद जोपासा. घरात २४ तासांसाठी कोणाला मदतीला ठेवायचं असल्यास त्यांचं ओळखपत्र तपासून घ्या. आपल्याजवळ त्यांचं ओळखपत्र, कायमचा व तात्पुरता पत्ता, दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर) व फोटो ठेवून घ्या. मानसिक ताणतणाव जाणवल्यास प्रशिक्षित समुपदेशकांची मदत घ्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT