Supplement Harmfull For Liver  Canva
आरोग्य

Supplement Harmfull For Liver | दररोज घेणाऱ्या सप्लिमेंट्समुळे यकृत व मूत्रपिंडांवर होतो घातक परिणाम!

जाणून घ्या काय धोके आहेत

shreya kulkarni

Daily Supplement Harmfull For Liver

आजकाल बरेच लोक दररोज मल्टिव्हिटॅमिन्स, हर्बल सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन पावडर घेतात, आरोग्यासाठी फायदेशीर वाटतं म्हणून. पण अनेक वेळा हे सप्लिमेंट्स तुमच्या यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंडांवर (किडनी) गंभीर परिणाम करू शकतात. काही जीवनसत्वं, हर्ब्स किंवा प्रोटीनचा जास्त डोस घेतल्यास, लिव्हरला त्याचं डिटॉक्स काम करताना खूप ताण येतो. यामुळे लिव्हर सुजणे किंवा अगदी फेल होण्याची शक्यता असते.

किडनीजच्या बाबतीतही धोका तेवढाच गंभीर आहे. जास्त प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन D किंवा प्रोटीन घेतल्यास, किडनीवर ताण येतो. काहींना त्यामुळे किडनी स्टोन होतात तर काहींना किडनी फेल्युअरही होऊ शकतो.

काही महत्त्वाचे धोके:

  • व्हिटॅमिन A – डोकेदुखी, लिव्हर डॅमेज आणि गर्भवती महिलांमध्ये जन्मदोष होण्याचा धोका

  • आयरन – जास्त घेतल्यास मळमळ, उलटी व अंगावरील अवयवांना नुकसान

  • व्हिटॅमिन D – कॅल्शियम वाढल्यामुळे मूत्रपिंडांमध्ये त्रास

  • व्हिटॅमिन E – रक्त जमताना अडथळा, औषधांशी वाईट प्रतिक्रिया

  • हर्बल सप्लिमेंट्स – उदा. ग्रीन टी एक्सट्रॅक्ट, हळद – लिव्हरवर घातक परिणाम

हे साइड इफेक्ट्स लगेच दिसून येत नाहीत. महिन्यांनंतर किंवा वर्षांनीही शरीर "व्हाईट फ्लॅग" दाखवू लागतं. शिवाय बाजारात मिळणारे सप्लिमेंट्स फारसे कडक नियमनात नसतात, त्यामुळे त्यांची गुणवत्ता, प्रमाण किंवा मिश्रण योग्य नसेलच असंही घडू शकतं.

सप्लिमेंट्स कधी उपयुक्त ठरतात?

  • विशिष्ट पोषणतत्त्वांची कमतरता असेल तेव्हा

  • शाकाहारी, अ‍ॅलर्जी असलेले लोक

  • गर्भवती महिलांसाठी फॉलिक अ‍ॅसिड

पण कोणतंही सप्लिमेंट घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. कारण तुमचं यकृत आणि किडनी तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी सतत काम करत असतात त्यांना अजून काम नको!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT