लंडन : Protective protein : तन-मनाच्या विश्रांतीसाठी आणि आरोग्यासाठीही सात ते आठ तासांची गाढ झोप आवश्यक असते. अपुर्या झोपेमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. झोप चांगली होत नसेल तर मेंदू योग्यप्रकारे काम करू शकत नाही. मेंदू व झोप यामध्ये नेमका काय संबंध आहे याची अनेकांना उत्सुकता असते. एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की आपल्या मेंदूमध्ये एक 'प्रोटेक्टिव्ह प्रोटिन' असते. मेंदूतील चेतापेशींच्या संरक्षणासाठी ते गरजेचे असते. त्याचा स्तर अपुर्या झोपेमुळे कमी होतो.
संबंधित बातम्या :
झोप पूर्ण न होत नसल्यास ही बाब मेंदूसाठी हानिकारक ठरते. त्यामुळे 'अल्झायमर्स'सारखे न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतात. मेंदूतील 'प्रोटेक्टिव्ह' म्हणजेच संरक्षणात्मक असा जो प्रोटिनचा स्तर असतो तो अपुर्या झोपेमुळे घटतो. झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूचा 'मेमरी हब' असे म्हटल्या जाणार्या 'हिप्पोकँपस'चेही नुकसान होते. त्यामुळे न्यूरोलॉजिकल आजार होऊ लागतात. Protective protein
झोप पूर्ण न झाल्याने मेंदूत कोणते बदल घडतात हे पाहण्यासाठी संशोधकांनी उंदरांवर काही प्रयोग केले. त्यांच्यामधील प्रोटिनची कमी आणि आरएनएमधील बदलांचीही तपासणी केली. कमी झोप घेणार्या उंदरांमध्ये 'प्लियोट्रोफिन' (पीटीएन) नावाच्या प्रोटिनचा स्तर अतिशय कमी असल्याचे त्यांना आढळून आले. हेच प्रोटिन माणसाच्या मेंदूतील हिप्पोकँपसमध्येही असते. त्याच्या कमतरतेमुळे हिप्पोकँपसमधील चेतापेशी मरू लागतात आणि मेंदू योग्यप्रकारे काम करू शकत नाही. त्याचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो. Protective protein
हे ही वाचा :