हायड्रोसिल म्हणजे अंडाकोशमध्ये येणारी सूज होय. अनेकदा नवजात शिशूमध्ये जन्मजात हा रोग दिसून येतो तर प्रौढ व्यक्तींमध्ये अनेक कारणांमुळे याची लक्षणे दिसून येतात. होमिओपॅथीमध्ये शस्त्रक्रियेशिवाय हायड्रोसिलवर उपचार करता येतात. आमच्या अॅडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये हायड्रोसिलचा यशस्वी उपचार केला आहे.v
डॉ. मनोज एस. पुजार
हायड्रोसील एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये पुरुषांच्या अंडकोषामध्ये तरल पदार्थ जमा होतो. त्यामुळे अंडकोषाला सूज येते. याची अनेक कारणे आहेत. नवजात शिशूमध्ये जन्मता हायड्रोसील असते. कारण, काही वेळा मुलांमध्ये युनिक वेजिनालीस संपूर्ण बंद न झाल्यामुळे लहान मुलांमध्ये हा रोग उद्भवण्याची दाट शक्यता असते. याला जन्मजात हायड्रोसिल असे म्हटले जाते. एक्वायर्ड हायड्रोसिल प्रकार प्रौढ पुरुषांमध्ये आढळून येतो. अंडकोषाला अचानक सूज येते. प्रौढ पुरुषांमध्ये वृषणाला सूज आली तर हा रोग आहे असे म्हणू शकतो. अनेकदा जखम झाल्यामुळे किंवा मार लागल्यामुळेही सूज येऊ शकते. वृषण कोशिकांना सूज आल्यामुळे ही बर्याच वेळा तरल द्रव पदार्थ अंडाकोषामध्ये जमा होतो व हा रोग होऊ शकतो. त्यामुळे वृषणातील कोशिकांना सूज येणे यामुळेही हायड्रोसिल होऊ शकते.
प्राथमिक लक्षणांमध्ये फक्त वृषण मध्ये सूज येते पण जर नियंत्रण झाले नाही तर ताप येणे, आकारामध्ये वाढ होणे, वेदना होणे ही समस्या उद्भवू शकते. तसेच जो तरल पदार्थ वाढत आहे. त्यामुळे जवळच्या संरचनेवरही ताण येऊ शकतो आणि संक्रमण वाढू शकते. तसेच चालताना त्रास होतो. शिवाय बसता नाही अवघडून बसावे लागते. वृषणाला फार सूज आल्यानंतर ची लक्षणे दिसू शकतात.
हायड्रोसिल ही समस्या जन्मापूर्वीची आहे म्हणूनच बहुतेक पुरुषांना वाटते आपण त्यातून सुटू शकत नाही. परंतु त्यांची विचारसरणी अगदी चुकीची आहे. कारण योग्य काळजीने हायड्रोसिल टाळता येऊ शकते. हायड्रोसिल टाळण्यासाठी जड वस्तू उचलणे टाळा, अति जास्त प्रमाणात व्यायाम करू नये, अती धावणे टाळा, घट्ट पॅन्ट वापरणे टाळा. होमिओपॅथी औषधोपचाराने हायड्रोसिल टाळू शकतो.
होमिओपॅथी हे एक शास्त्र आहे. यामध्ये रुग्णाची माहिती फार महत्त्वाची असते. त्यांचा स्वभाव कोणत्या परिस्थितीवर कसे वागतात यावरही औषध अवलंबून असते. शिवाय सतत पडणार्या स्वप्नांचाही संबंध असतो. औषधोपचारांमध्ये जेवणाच्या सवयी, बोलण्याची शैली, यावरही औषध अवलंबून असते. होमिओपॅथी औषध उपचार यामुळे हायड्रोसिल रोग नक्कीच बरा होऊ शकतो. साधारणतः लहान मुलांमध्ये औषधोप चार करून शस्त्रक्रियेशिवाय होमिओपॅथिक उपचार होऊ शकतात. होमिओपॅथिक औषध हे घेण्यासाठी अत्यंत सोपे आहे. तसेच लहान मुलांना औषध घेण्यात काहीही त्रास होऊ शकत नाही, प्रौढांमध्येही होमिओपॅथिक उपचारांचा चांगला परिणाम दिसून आला आहे.