शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच या वनस्पतीची पानेदेखील आरोग्यासाठी लाभदायक आहेत. .दररोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास ते आरोग्याला लाभदायक ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. .यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह यासारखी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. .ते प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडंटस्चादेखील एक उत्कृष्ट स्रोत आहे..कमी कॅलरीज आणि उच्च पोषण असलेले हे पेय वजन कमी करण्यास प्रभावी ठरू शकते. .याच्या सेवनाने चयापचय वाढते, शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करण्यास मदत होते आणि प्यायल्यानंतर बराच काळ पोट भरलेले राहते. .शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटी-ऑक्सिडंटस् भरपूर असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. .शेवग्याच्या पानांचे पाणी नियमितपणे प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गाचा धोका कमी होतो. .शेवगा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास प्रभावी ठरू शकतो. तसेच, कोलेस्टेरॉलची पातळीदेखील नियंत्रित ठेवतो.