पुढारी ऑनलाईन – डायबेटिज झालेल्या व्यक्तींनी खाण्यपिण्यावर विशेष लक्ष देण्याची नितांत गरज असते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी डायबेटिजच्या व्यक्तींना बरीच पथ्य पाळावी लागतात. कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खावू नयेत, यासाठी ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) ही संकल्पना फायद्याची ठरते. ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे, किंवा वजन कमी करायचे आहे अशांसाठीही ही Glycemic index फायद्याचा आहे.
ज्या पदार्थांत कार्बोहायड्रेट असतात, अशा पदार्थांचा Glycemic index ठरवला जातो. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तात किती वेळात ग्लुकोज (साखर) निर्माण होते, यावर Glycemic index ठरतो. जे पदार्थ खाल्ल्यानंतर फार कमी वेळात रक्तात साखर तयार होते, अशा पदार्थांचा Glycemic index जास्त असतो. तर जे पदार्थ खाल्ल्यानंतर साखर निर्माण होण्याची प्रक्रिया संथ गतीने होते, अशांचा Glycemic index कमी असतो.
जास्त Glycemic indexचे पदार्थ खाल्ले तर रक्तात फार कमी वेळात साखर येते. याला शुगर स्पाईक म्हणतात. टाईप १ आणि टाईप २ अशा दोन्ही पैकी कोणताही डायबेटिज असेल तर जास्त Glycemic index चे पदार्थ खाणे हे आरोग्यासाठी अपायकारक ठरते. पांढरा बात, व्हाईट ब्रेड, साखरेचे पदार्थ, बटाटा यांचा Glycemic index जास्त असतो. म्हणून असे पदार्थ डायबेटिजच्या रुग्णांनी खाऊ नयेत.
कमी Glycemic index असलेले पदार्थांमुळे रक्तात संथ गतीने साखर येते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहाण्यासाठी मदत होते. भाजीपाला, जास्त न पिकलेली फळे, भाकरी, चपाती यांचा Glycemic index कमी असतो. डायबेटिज असलेल्या व्यक्तींनी अशा पदार्थांचा आहारात जास्त समावेश करणे आवश्यक असते. Glycemic index कमी असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही, त्यामुळे सारखे खाण्याची इच्छाही होत नाही.
जास्त Glycemic index असणारे पदार्थ – व्हाईट ब्रेड (७५), कॉर्नफ्लेक्स (८१), बटाटा (७८), भात (७३)
कमी Glycemic index असणारे काही पदार्थ – कच्चे सफरचंद (३६), स्वीट कॉर्न (५२), चपाती (५२)
संदर्भ – https://www.health.harvard.edu/
हेही वाचा