Diabetes File Photo
आरोग्य

Diabetes study: मधुमेहाचा पुरुष आणि महिलांवर होतो वेगवेगळा परिणाम; जाणून घ्या कोणाला आहे सर्वाधिक धोका

मधुमेहावर आधारित एका नवीन संशोधनातून अत्यंत महत्त्वाचा खुलासा झाला आहे. स्त्री आणि पुरुषांची जैविक रचना वेगळी असल्याने त्यांच्यावर आजारांचा प्रभावही वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो.

पुढारी वृत्तसेवा

Diabetes study

नवी दिल्ली: स्त्री आणि पुरुषांची जैविक रचना वेगळी असल्याने त्यांच्यावर आजारांचा प्रभावही वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. महिलांमध्ये लठ्ठपणा, थायरॉईड आणि ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारांची शक्यता अधिक असते, तर पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका जास्त पाहायला मिळतो. याच संदर्भात मधुमेहावर आधारित एका नवीन संशोधनातून अत्यंत महत्त्वाचा खुलासा झाला आहे.

या अभ्यासानुसार, मधुमेह झाल्यानंतर महिला आणि पुरुषांवर त्याचा वेगवेगळा परिणाम होतो. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर महिलांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो, तर पुरुषांमध्ये हृदय आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका अधिक असतो.

महिला आणि पुरुषांमध्ये या आरोग्य समस्या वेगवेगळ्या प्रकारे जाणवतात. मात्र, टाईप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये लिंग आणि वयानुसार हा आजार कसा वाढत जातो, यावर आतापर्यंत कोणताही सखोल अभ्यास झाला नव्हता.

महिला आणि पुरुषांवर वेगवेगळा प्रभाव

ब्रिटेनच्या 'क्वीन मॅरी युनिव्हर्सिटी' आणि इतर संशोधकांच्या या अभ्यासाचे निष्कर्ष 'प्लोस मेडिसिन' या प्रसिद्ध मासिकात प्रकाशित झाले आहेत. या अभ्यासासाठी २०१० ते २०२० दरम्यान टाईप-२ मधुमेह निदान झालेल्या सुमारे २८,७२० पुरुष आणि महिलांच्या आरोग्य नोंदींचे सखोल विश्लेषण करण्यात आले. आजाराचे निदान झाल्यानंतरच्या काळात तब्बल ३९ टक्के रुग्णांना किमान एका गंभीर आजाराचा सामना करावा लागला. यामध्ये आजाराची तीव्रता आणि वेळ ही लिंगानुसार वेगवेगळी असल्याचे समोर आले.

पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब आणि किडनीच्या आजाराचा धोका

संशोधनात असे आढळून आले की, मधुमेहाचे निदान झाल्यानंतर महिलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता ८.१ टक्के होती (पुरुषांमध्ये हे प्रमाण ५.३ टक्के होते), ज्यामुळे अखेरीस मृत्यू ओढवला. याउलट, पुरुषांमध्ये हृदयविकार (८.४ टक्के विरुद्ध ५.३ टक्के), किडनीचे गंभीर आजार आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण महिलांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT