Homemade Detox Water Canva
आरोग्य

Homemade Detox Water | डिटॉक्स वॉटरने कमी करा बॉडी फॅट, जाणून घ्या घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत

Homemade Detox Water | तुमच्या दैनंदिन दिनचर्येत एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय समाविष्ट करावा लागेल डिटॉक्स वॉटर.

shreya kulkarni

आपल्या शरीरावर जमा होणारी अतिरिक्त चरबी, विशेषतः पोट आणि कंबरेभोवतीची, कमी करणे अनेकांसाठी मोठे आव्हान ठरते. जर तुम्ही विविध डाएट्स, वर्कआउट्स करूनही काही विशेष फरक जाणवत नसेल, तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय समाविष्ट करावा लागेल डिटॉक्स वॉटर.

डिटॉक्स वॉटर म्हणजे काय?

डिटॉक्स वॉटर हे फळं, मसाले, औषधी वनस्पती (हर्ब्स) आणि भाज्यांपासून तयार केलेले infused पाणी असते, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. हे शरीर हायड्रेट ठेवते, पचन सुधारते, मेटाबॉलिज्म वाढवते आणि चरबी कमी करण्यात उपयोगी ठरते.

सोडा, कोल्ड ड्रिंक आणि साखरयुक्त कृत्रिम पेयांपेक्षा डिटॉक्स वॉटर हे पोषणमूल्यांनी युक्त आणि कमी कॅलरीचे हेल्दी पर्याय ठरते.

डिटॉक्स वॉटरचे फायदे

  • मेटाबॉलिज्म वाढवते: यामुळे शरीरातील चरबी वेगाने वितळू लागते.

  • पचन सुधारते: नैसर्गिक घटकांमुळे पोट साफ राहतो, बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते.

  • हायड्रेशन: उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी फायदेशीर.

  • भूक कमी करते: पोट भरल्यासारखे वाटल्यामुळे अति खाणे टळते.

  • विषारी घटक बाहेर टाकते: लिव्हर व किडनीला डिटॉक्समध्ये मदत करते.

डिटॉक्स वॉटर कसे बनवावे?

हे वॉटर बनवणे खूप सोपे आहे. खाली दिलेली एक सोपी आणि प्रभावी रेसिपी पाहा:

साहित्य:

  • १ लिटर थंड पाणी

  • ५-६ काकडीचे स्लाइस

  • १-२ लिंबाचे काप

  • काही पुदिन्याची पाने

  • इच्छेनुसार – २-३ तुकडे आले किंवा काही थेंब Apple Cider Vinegar

कृती:

वरील सर्व घटक एका काचेच्या बाटलीत घालून २-३ तास फ्रीजमध्ये ठेवावेत. दिवसभर थोडं-थोडं करत हे पाणी प्यावं.

अधिक फायदे मिळवण्यासाठी या गोष्टी वापरा:

  • आले (Ginger): नैसर्गिक मेटाबॉलिज्म बूस्टर. सूज कमी करतो व पाचन सुधारतो.

  • Apple Cider Vinegar: चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो.

  • बेरिज, संत्री, दालचिनी: विविध फळांचे तुकडे घालून चव आणि पोषकतत्त्व वाढवू शकता.

डिटॉक्स वॉटर हा वजन कमी करण्याचा एक सोपा, नैसर्गिक आणि चवदार मार्ग आहे. रोजच्या आहारात याचा समावेश केल्यास तुम्हाला शरीर हायड्रेट राहील, पचन सुधारेल आणि चरबी कमी होण्यास मदत होईल. व्यायाम आणि संतुलित आहारासोबत डिटॉक्स वॉटरचा नियमित वापर केल्यास तुम्हाला नक्कीच परिणाम दिसून येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT