Vitamin C Deficiency | आरोग्यदायी जीवनाचे 'सी'क्रेट आहे विटामिन C

Vitamin C Deficiency | विटामिन C च्या कमतरतेमुळे होऊ शकतात या ५ आजारांपासून वेळीच सावध व्हा, अन्यथा जीवाला धोका!
Vitamin C Deficiency
Vitamin C Deficiency Canva
Published on
Updated on

Vitamin C Deficiency

विटामिन C हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं आणि विविध अवयवांचे कार्य सुरळीत ठेवतं. मात्र, जर आहारातून याचा पुरेसा पुरवठा नसेल, तर याची कमतरता अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते.

Vitamin C Deficiency
India Pakistan Tension : भारताच्या सीमेपासून पाकिस्‍तानची राजधानी इस्‍लामाबाद किती अंतरावर आहे?

1. स्कर्वी (Scurvy):

नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या प्रिव्हेन्टिव हेल्थ विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत यांच्या मते, विटामिन C च्या दीर्घकाळ कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. यात थकवा, अशक्तपणा, मसूड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर निळसर डाग दिसणे आणि सांधेदुखी अशी लक्षणे दिसतात. ही स्थिती कोलेजनच्या कमतरतेमुळे होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या आणि ऊती कमजोर होतात.

2. अ‍ॅनिमिया (Anemia):

Summary

विटामिन C आयर्नच्या शोषणात मदत करतं, जे रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी आवश्यक असतं. जर शरीरात याची कमतरता असेल, तर शरीर योग्यप्रकारे आयर्न शोषून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे अ‍ॅनिमिया होऊ शकतो.

3. हिरड्यांचे आजार:

विटामिन C ची कमतरता हिरड्या कमजोर करते. यामुळे सूज, रक्तस्राव, दुखणं, आणि गंभीर अवस्थेत दात गळणं किंवा मसूडे सडणं यासारख्या समस्या उद्भवतात. या कारणामुळे तोंडातून दुर्गंधी येण्याची शक्यता वाढते.

Vitamin C Deficiency
Pakistan Foreign Minister | भारताने दिला निर्वाणीचा इशारा, पाकच्‍या परराष्ट्र मंत्र्यांनी दिले 'नमते' घेण्‍याचे संकेत

4. जखमा भरून येण्यास विलंब:

कोलेजनच्या कमतरतेमुळे शरीरातल्या जखमा सहज भरून येत नाहीत. जखमा उशिरा भरतात आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

5. सांधेदुखी व हाडांचा कमकुवतपणा:

कोलेजन कमजोर झाल्यास सांध्यांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो आणि त्यामुळे सूज व वेदना निर्माण होतात. हाडे कमजोर होऊन हाडदुखीची तक्रार सुरू होते.

विटामिन C कुठून मिळेल?

विटामिन C प्रामुख्याने आंबट फळांमध्ये भरपूर प्रमाणात असते जसे की संत्रं, लिंबू, आवळा, कीवी, स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो. रोजच्या आहारात या गोष्टींचा समावेश करून आपण विटामिन C च्या कमतरतेपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो.
विटामिन C फक्त सर्दी-खोकल्याच्या उपचारापुरतंच मर्यादित नाही. त्याचा संबंध आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे याची कमतरता वेळीच ओळखा आणि योग्य आहाराच्या माध्यमातून भरपाई करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news