Cycling And Brain Recharging pudhari
आरोग्य

Cycling And Brain Recharging: सायकलिंग म्हणजे मेंदूचे 'रिचार्जिंग'... फक्त फिटनेस नाही तर बैद्धिक क्षमताही वाढवते

Anirudha Sankpal

Cycling And Brain Recharging: लहाणपणी आपण सर्वंनी सायकलिंग केलं आहे. त्यावेळी आपण सांकलिंग फिटनेससाठी नाही तर एक खेळ म्हणून सायकलिंग करत होते. आपसुकच आपला व्यायाम देखील होत होता. मात्र आता एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की सायकल चालवल्यामुळं फक्त फिटनेस चांगला राहतो असं नाही तर त्याचा फायदा आपल्या मेंदूला आणि त्याच्या कार्यक्षमतेला देखील होतो.

नुकत्याच झालेल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अभ्यासात समोर आलं आहे की सायकल चालवण्याने मेंदू स्वस्थ होतो, मूड चांगला होतो आणि सामाजिक संबंध सदृढ करण्याच्या दृष्टीकोणातून सायकलिंग अत्यंत प्रभावी व्यायाम ठरू शकतो.

कोणी केलंय संशोधन?

आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मानसिक समस्यांचे प्रमाण वाढलं आहे. बैठ्या कामाच्या स्वरूपामुळे शारीरिक हालचाली कमी होत आहेत. त्यामुळं शास्त्रज्ञांनी या समस्या कमी करण्यासाठी स्वस्त आणि प्रभावशाली उपाय शोधण्याचा प्रयत्न केला.

याबाबत अमेरिकेतील एनजीओ संस्था आऊटराईड कंपनीने ओक्लाहोमा विद्यापीठ आणि लोमा लिंडा विद्यापीठातील संशोधकांनी मिळून एक संशोधन केलं. या संशोधनातून काही निष्कर्ष निघाले आहेत.

या संशोधकांनी १९ देशांच्या डेटाचा अभ्यास केला. यात अमेरिका, कॅनडा आणि अनेक युरोपीयन देशाचा समावेश होता. या देशातील वेगवेगळ्या जवळपास ९०अभ्यासांची सखोल विश्लेषण करण्यात आलं. याबाबतचे संपूर्ण शोध प्रसिद्ध मॅगझिन फ्रंटियर्स इन स्पोर्ट्स अँड एक्टिव लिविंग मध्ये प्रकाशित झाला.

मेंदू अन् मूडवर काय होतो परिणाम?

या संशोधनात मिळालेले निष्कर्ष अत्यंत सकारात्मक होते. विश्लेषणानुसार सायकलिंगचा थेट आणि सकारात्मक प्रभाव आपल्या मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीवर पडतो. याचे प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

  • सायकल चालवण्याने रिअॅक्शन टाईम चांगला होतो. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते.

  • यामुळं विचार करणे, समजून घेणे, शिकण्याची मेंदूची क्षमता वाढते.

  • सायकलिंगचा नियमीत सराव केल्यामुळं मूड चांगला होतो. डिप्रेशनची लक्षणे कमी होतात.

  • सायकलिंगमुळं सामाजिक संबंधांमध्ये देखील सुधारणा होते. सामाजिक वावर वाढतो.

अजूनही मोठा वाव

जरी संशोधकांनी सायकिलिंगच्या फायद्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र अभ्यासकांच्या मते या दृष्टीकोणातून अजून अभ्यास करण्याची गरज आहे. त्यांनी भविष्यात युवाक, वयस्कर आणि इतर घटकांपर्यंत सायकलिंग पोहचवणे गरजेचे आहे. या दृष्टीकोणातून अजून अभ्यास करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT