जेव्हा जेव्हा जीऱ्याचा उल्लेख होतो, तेव्हा आपल्याला त्याचा वापर स्वयंपाकात चव वाढवण्यासाठी व तडका देण्यासाठी केला जातो हेच आठवते. पण जीरं केवळ चव वाढवण्यासाठी नाही, तर ते औषधी गुणधर्मांनी भरलेले आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जीरं केवळ पचन सुधारण्यात मदत करत नाही तर मेटाबॉलिझम वाढवून आणि भूक कमी करून वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.
जीऱ्यात फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि पुन्हा पुन्हा खाणे टाळले जाते. त्यामुळे एकूण कॅलोरी इनटेक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते. जीरं भूक कमी करण्यात देखील प्रभावी ठरते.
जीरा अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो, जो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत करतो. शिवाय कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यात आणि ब्लड शुगरही नियंत्रणात ठेवण्यात जीरं फायदेशीर ठरू शकतं.
जीऱ्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सशी लढण्याचे काम करतात आणि एकंदर आरोग्य सुधारण्यास हातभार लावतात. हे पचन एन्झाईम्स वाढवते, ज्यामुळे अन्न सहज पचते आणि अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या टळतात.
काही संशोधनातून असे आढळले आहे की जीरं मेटाबॉलिज्म वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलोरी अधिक वेगाने बर्न होते. जीऱ्यातील विशिष्ट संयुगे पचन व चयापचय प्रक्रियेला चालना देतात आणि त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात अर्धा चमचा जीरं उकळवून त्याचा काढा पिल्यास तुमचे पोटातील चरबी कमी होण्यास आणि पचन सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते.