

प्रत्येक वर्षी १६ मे रोजी “राष्ट्रीय डेंग्यू दिवस” साजरा केला जातो. यामागचा हेतू म्हणजे लोकांमध्ये डेंग्यूबद्दल जागरूकता वाढवणं. डेंग्यू हा एक प्रकारचा ताप आहे जो विशेष मच्छराच्या चाव्यामुळे होतो. या मच्छराचं नाव आहे "एडीज" आणि तो मुख्यतः सकाळी व संध्याकाळी चावतो. विशेष म्हणजे हा मच्छर स्वच्छ पाण्यात वाढतो.
या आजाराची सुरुवात तीव्र तापाने होते. यासोबत डोकेदुखी, सांधेदुखी, अंग दुखणे, त्वचेवर लाल चट्टे आणि अत्याधिक अशक्तपणा जाणवतो. काही वेळेस रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊन रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास डेंग्यू जीवघेणा ठरू शकतो.
अचानक ताप येतो
डोके, अंग, सांधे दुखतात
त्वचेवर लाल चट्टे येतात
थकवा आणि अशक्तपणा जाणवतो
कधी कधी रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात
एडीज मच्छर स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे घरातील कूलर, फ्लॉवर पॉट, पाण्याची टाकी, ओपन डब्बे इत्यादी स्वच्छ ठेवणे व पाणी साचू न देणे आवश्यक आहे. या मच्छराचे शरीर काळे असून त्यावर पांढऱ्या पट्ट्या असतात.
घरातल्या कूलरमध्ये
फ्लॉवर पॉटमध्ये
पाण्याच्या टाकीत
इतर कुठल्याही ठिकाणी जिथे पाणी साचलेलं असतं
हा मच्छर दिसायला काळा असतो आणि त्याच्या अंगावर पांढऱ्या पट्ट्या असतात.
डेंग्यू हा टाळता येण्यासारखा आजार आहे, फक्त योग्य काळजी घेणे आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिवसाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने जागरूक राहून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. डेंग्यूपासून बचावच सर्वात मोठा उपाय आहे.
पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत
रात्री झोपताना मच्छरदाणी वापरा
घरात व घराबाहेर पाणी साचू देऊ नका
कीटकनाशक फवारणी करा
क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, दरवर्षी जगभरात सुमारे ४० कोटी लोक डेंग्यूमुळे बाधित होतात. परंतु त्यामध्ये अनेक रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण दिसून येत नाहीत. म्हणूनच काळजी घेणे आणि लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.
रुग्णाला भरपूर पाणी, नारळपाणी, लिंबूपाणी, सूप, फळांचा रस द्या
ताप आला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटामॉल द्या
स्वतःहून कोणतीही गोळी घेऊ नका
काही लोक पपईच्या पानाचा रस किंवा गिलोयचा काढा घेतात, पण याचा पूर्ण फायदा होतो की नाही हे अजून स्पष्ट नाही, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या
तळलेले व जड अन्न खाणं टाळा
डेंग्यूपासून वाचायचं असेल तर स्वच्छता ठेवा, मच्छर टाळा आणि सावधगिरी बाळगा! वेळेवर योग्य काळजी घेतली, तर डेंग्यूपासून सहज वाचता येऊ शकतं.