Cold Drink Health Risks
रिओ डी जानेरिओ : ब्राझीलचे प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. थेल्स अँड्रेड यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो आतापर्यंत ८५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यामध्ये त्यांनी रुग्णाच्या मूत्राशयातून पिवळ्या खड्यांचे अनेक मोठे तुकडे काढण्यात आलेल्या शस्त्रक्रियेची झलक दाखवली.
डॉक्टरांनी सांगितले की, हे सर्व त्या माणसाच्या जास्त म्हणजेच दिवसाला तीन लिटर कोल्ड्रिंक पिण्याच्या सवयीमुळे घडले. डॉ. अँड्रेड यांनी स्पष्ट केले की, शीतपेयांसारख्या साखर आणि कार्बोनेटेड पेयांमध्ये फॉस्फरिक अॅसिड आणि इतर रसायने असतात. ज्यामुळे शरीरात आम्लयुक्त वातावरण तयार होते. यामुळे मूत्रमार्गात कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि खडे तयार होऊ लागतात.
डॉक्टरांच्या मते, रुग्णाच्या शरीरात खडे तयार होण्याची प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू होती. जेव्हा प्रकृती बिघडली तेव्हा तीव्र वेदना, लघवीतून रक्त येणे आणि उलट्या होणे, अशी लक्षणे दिसू लागली. त्यानंतर तपासणीत असे दिसून आले की, रुग्णाच्या मूत्राशयात मोठ्या प्रमाणात खडे जमा झाले होते आणि त्वरित शस्त्रक्रिया आवश्यक होती.