थोडं चाललं की श्वास लागतोय? हा फक्त वयानुसार होणारा बदल नसून शरीरात काही गंभीर बिघाडाचे संकेत असू शकतात. योग्य वेळेत कारणं ओळखा आणि 5 सोप्या उपायांनी श्वासाचा त्रास दूर करा.
श्वास हीच जीवनाची खरी डोरी असते. मात्र हलकंसं चढणं, चालणं किंवा रोजच्या कामात थोडंही exertion झालं की श्वास घ्यायला त्रास होतो ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. वजन वाढ, वयोमान अशा कारणांबरोबरच श्वसनक्रियेशी संबंधित आजार, पोषणतत्त्वांची कमतरता, आणि हार्मोनल असंतुलन देखील यामागे असू शकतात.
न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर यांनी यामागील ५ प्रमुख कारणं आणि त्यावरचे ५ घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय नियमित केल्यास श्वास लागणे आणि थकवा या समस्या दूर होऊ शकतात.
शरीरात हीमोग्लोबिन व आयर्नची कमतरता
फुफ्फुसांची क्षमता कमी होणे (shallower breathing)
व्हिटॅमिन B12 व D यांची कमतरता
शरीरात टॉक्सिन्स साचणे व स्टॅमिना कमी होणे
हार्मोनल असंतुलन व मेटाबॉलिझम मंदावणे
दिवसाची सुरुवात बीट आणि आवळा रसाने करा
रोज कडीपत्ता आणि भिजवलेल्या काळ्या मनुका खा हे थकवा आणि आयर्नसाठी लाभदायक ठरते
दररोज अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायाम फक्त ५ मिनिटं करा
स्टेअर इंटरवल वॉकिंग – १ मजला हळूहळू चढा, विश्रांती घ्या, हे दिवसातून २-३ वेळा करा
जेवणात गहू, नाचणी (मिलेट्स) आणि तूपाचा समावेश
जेवण चुकवू नका – यामुळे एनर्जी लवकर संपते
या उपायांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ही माहिती सोशल मीडियावर आधारित असून प्रत्येकासाठी परिणाम वेगळा असू शकतो.