Ashadhi Ekadashi Special Kardant Barfi AI image
आरोग्य

Ashadhi Ekadashi Special | घरच्या घरी करदंट बर्फी कशी बनवायची? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

Ashadhi Ekadashi Special | घरच्या घरी करदंट बर्फी कशी बनवायची? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

पुढारी वृत्तसेवा

आषाढी एकादशीच्या उपवासात करदंट बर्फी हा चविष्ट आणि पौष्टिक गोड पदार्थ ठरू शकतो. खजूर, सुका मेवा, गूळ आणि डिंक यापासून बनणारी ही बर्फी शरीराला ऊर्जा देते आणि बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते. कमी साखर आणि अधिक पोषणमूल्यांमुळे ही रेसिपी उपवासासाठी उत्तम पर्याय आहे.

साहित्य:

साजूक तूप: ३ ते ४ मोठे चमचे

खाण्याचा डिंक (Edible Gum): ५० ग्रॅम

गूळ (बारीक चिरलेला): १ कप

खजूर (बिया काढून बारीक चिरलेले): अर्धा कप

बदाम, काजू, मणुके (बारीक तुकडे): प्रत्येकी अर्धा कप

सुक्या खोबऱ्याचा किस: अर्धा कप (मंद आचेवर भाजलेला)

खसखस: २ चमचे

वेलची आणि जायफळ पूड: १ चमचा

बनवण्याची सोपी पद्धत:

कढईत २ चमचे तूप गरम करा. मंद आचेवर खाण्याचा डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्या. गार झाल्यावर हाताने किंवा तांब्या तांब्याने हलका चुरा करून घ्या.

उरलेल्या तुपात काजू, बदाम आणि मणुके मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर खसखस आणि सुके खोबरे हलके भाजून बाजूला काढा.

कढईत १ चमचा तूप घालून त्यात बारीक चिरलेला गूळ आणि खजूर टाका. गूळ मंद आचेवर फक्त विरघळवून घ्या (पाकात एकतारी किंवा पक्का पाक करायचा नाही).

गूळ विरघळल्यावर गॅस बंद करा. त्यात तळलेला डिंक, भाजलेला सुकामेवा, खोबरे, खसखस, वेलची-जायफळ पूड घालून सर्व मिश्रण पटपट एकत्र करा.

तुपाचा हात लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये हे गरम मिश्रण पसरवून छान थापून घ्या. मिश्रण कोमट असतानाच सुरीने बर्फीच्या आकाराच्या वड्या पाडून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर वड्या वेगळ्या करा.

उपवासासाठी करदंट बर्फीचे फायदे-

डिंक, तूप आणि गुळामुळे उपवासाच्या दिवशी येणारा अशक्तपणा दूर होतो.

यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर होत असल्याने ही आरोग्यदायी आहे.

ही बर्फी हवाबंद डब्यात १५ ते २० दिवस सहजरीत्या टिकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT