
आषाढी एकादशीच्या उपवासासाठी बटाट्याचा चटपटीत आणि सोपा सार बनवण्याची रेसिपी पाहा
साहित्य
बटाटे: २ (स्वच्छ धुऊन बारीक चिरलेले)
शेंगदाण्याचा कूट: २ ते ३ मोठे चमचे (भाजलेल्या शेंगदाण्यांचा)
जिरे: १ छोटा चमचा
लाल तिखट (बुक्की): चवीनुसार
साखर किंवा गूळ: चवीनुसार
मीठ: चवीनुसार (उपवासाचे सेंधव मीठ वापरू शकता)
तेल: २ चमचे
पाणी: आवश्यकतेनुसार (सार घट्ट हवा की पातळ त्यानुसार)
कोथिंबीर: बारीक चिरलेली (उपवासाला चालत असल्यास)
कृती -
एका भांड्यात २ चमचे तेल गरम करा. त्यात १ छोटा चमचा जिरे घाला. जिरे छान तडतडल्यावर बारीक चिरलेला बटाटा घाला
मध्यम आचेवर बटाट्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या.
बटाटा लालसर परतल्यानंतर त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट (बुक्की), चवीनुसार मीठ आणि साखर (किंवा गूळ) घाला.
हे सर्व मिश्रण मंद आचेवर १-२ मिनिटे पुन्हा छान परतून घ्या.
आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी ओता. सार छान ढवळून घ्या आणि बटाटा पूर्ण मऊ शिजेपर्यंत उकळू द्या.
सार शिजून तयार झाल्यावर शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
तुमचा गरमागरम आणि चवदार बटाट्याचा सार आषाढी एकादशीच्या उपवासाला वरीच्या भातासोबत (वरई/भगर) किंवा साबुदाणा वड्यासोबत सर्व्ह करण्यासाठी तयार आहे!