Health Care Tips
कोरफड आणि आरोग्य File Photo
आरोग्य

Health Care Tips|कोरफड आणि आरोग्य

पुढारी वृत्तसेवा

डॉ. भारत लुणावत

कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. मात्र, आपल्यापैकी अनेकांना कोरफडीमधील या गुणधर्माची माहिती नसते. कोरफडीच्या पानांचे टोक तीक्ष्ण असते. या पानांमध्ये कोरफडीचा गर असतो. कोरफडांच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे वर्षांनुवर्षे हे झाड तगून राहाते.

कोरफडीचा वापर अनेक व्याधींमध्ये, आजारांमध्ये, दुखण्यांमध्ये करता येतो. शरीरावर असलेल्या भाजल्याच्या खुणा नष्ट करण्यासाठी कोरफडीचा वापर केला जातो. याचबरोबर त्वचेचे अनेक आजार दूर करण्यात कोरफड उपयुक्त ठरते.

केसांच्या आरोग्याकरिता कोरफडीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरफडीचा गर केसांना नियमित लावल्यास कोंडा दूर होतो. पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठीही कोरफड उपयुक्त ठरते. त्याकरिता कोरफडीचा ताजा गर घेतला पाहिजे.

चेहऱ्यावर आलेली सूज दूर करण्याकरता कोरफडीचा वापर केला जातो. बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशांकरिता कोरफड हा प्रभावी उपचार समजला जातो. कोरफडींच्या पानांचा रस अनेक आजारांवर उपयुक्त ठरतो. कोरफडीमुळे शरीरातील अॅसिडिटी कमी होते. फ्लूचा व्हायरस नष्ट करण्याकरिता ही कोरफडीचा रस प्रभावी औषध म्हणून काम करतो.

शरीरात वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण होणारी विषद्रवे (टॉसिन्स) नष्ट करण्याकरिता कोरफड प्रभावी ठरते. यासाठी सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी कोरफडीचा गर खावा. अलीकडे बाजारात कोरफडीचा रस तयार स्वरूपात मिळू लागला आहे. शरीरातील उष्णता शोषून घेण्याचे कामही कोरफडीच्या रसाद्वारे केले जाते. बाजारात मिळणाऱ्या रसापेक्षा रोज कोरफडीचे ताजे पान घेऊन त्याचा गर काढून, त्याचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.

SCROLL FOR NEXT