Latest

देव तारी त्याला कोण मारी! बापाने घेतली मुलासह धावत्या रेल्वेसमोर उडी, मात्र मुलगा वाचला

दीपक दि. भांदिगरे

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा

मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस समोर आपल्या मुलासह उडी मारून वडिलांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बुधवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला असला तरी सहा वर्षाचा चिमुरडा मात्र सुखरूप बचावला आहे.

प्रमोद आंधळे हे उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात राहतात. त्यांच्या सहा वर्षाचा मुलगा स्वराज याच्यासह ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकात आले होते. विठ्ठलवाडी स्थानकात ट्रेन येण्याची त्यांनी वाट पहिली आणि मुंबईहून पुण्याकडे जाणारी डेक्कन एक्स्प्रेस येत असल्याचा अंदाज घेऊन त्यांनी लहान मुलासह रेल्वे रुळावर उडी मारली आणि आत्महत्या केली. दुर्घटनेत गाडीची धडक बसल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांचा मुलगा स्वराज ट्रॅक मधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावला. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीच प्रत्यय येथे पहावयास मिळाला.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्वराजला बाहेर काढले तर प्रमोद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रमोद यांनी आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य टाइम ट्रॅव्हल मधून उलघडणार ? | James Webb Space Telescope | NASA

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT