Latest

Farooq Abdullah Reply: ‘मी त्यांना दिवसाच भेटेन’; फारूख अब्दुल्ला यांचे आझाद यांना प्रत्युत्तर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीरमधील अब्दुल्ला पिता-पुत्र हे रात्रीच्या वेळी केंद्रीय नेतृत्त्वाला भेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गुलाब नबी आझाद यांनी केला आहे. या आरोपाला 'मी त्यांना रात्री का भेटू' असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. 'मला भेटायचेच असेल तर, मी त्यांना दिवसाच भेटेन' असे प्रत्युत्तर देखील जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे संस्थापक गुलाब नबी आझाद यांना दिले आहे. (Farooq Abdullah Reply)

मी त्यांना रात्री का भेटू?- अब्दुल्ला

फारूक अब्दुल्ला यांनी ANI या वृत्तसंसंथेशी बोलताना, "मला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायचे असेल तर मी त्यांना दिवसा भेटेन. मी त्यांना रात्री का भेटू? फारुख अब्दुल्ला यांची बदनामी करण्याचा विचार त्यांच्या मनात येण्याचे कारण काय?" असे प्रश्न अब्दुल्ला यांनी गुलाब नबी आझाद यांना केले आहेत. (Farooq Abdullah Reply)

त्यांच्या दिल्लीतील एजंटनी लोकांना सत्य सांगावे

आझाद यांना राज्यसभेची जागा द्यायची नव्हती तेव्हा मीच त्यांना राज्यसभेची जागा दिली होती; पण आज ते सर्व सांगत आहेत आहेत, हे मला माहित नाही. त्यांनी दिल्लीतील त्यांच्या ज्या सूत्रांचा हवाला दिला आहे. ते जे त्यांचे एजंट पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी बसलेले आहेत. त्यांनी लोकांना सांगावे जेणेकरून त्यांना सत्य समजेल, असा टाेलाही अब्दुल्ला यांनी लगावला. (Farooq Abdullah Reply)

मोदींच्या भेटीसाठी अब्दुल्ला पिता-पुत्रांची धडपड- आझाद यांचे आरोप

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत, असा दावा गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

२०१४ मध्ये भाजपसोबत युती करण्याचे अब्दुल्ला पिता-पुत्रांचे प्रयत्न

जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी २०१४ मध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी भविष्यात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होण्याचे संकेत दिले होते, जे नंतर ओमर अब्दुल्ला यांनी नाकारले, असा दावा देखील आझाद यांनी केला. अशाप्रकारे अब्दुल्ला पिता-पुत्र जोडीने दुहेरी खेळ खेळत असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT