Farooq Abdullaha On Ram : ‘मेरे राम, मेरे राम… ‘ ; फारूक अब्दुल्लाही झाले राम भजनात दंग

Farooq Abdullaha On Ram
Farooq Abdullaha On Ram

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देश प्रतीक्षा करत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात राममय वातावरण झाले आहे. दरम्यान, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये फारूक अब्दुल्ला संभाषणात शेवटी रामभजनात दंग झाल्‍याचे दिसले. हा व्हिडिओ कपिल सिब्बल यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Farooq Abdullaha On Ram)

व्हायरल झालेला व्हिडिओ 'दिल से विथ कपिल सिब्बल' यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. या संभाषणात दोन्ही नेत्यांनी देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. याचवेळी दोघांनी राम मंदिरासोबतच प्रभू रामाच्या जीवनावरही चर्चा केली आहे. देशातील सध्याची स्थिती आणि देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या व्हिडिओमध्ये शेवटच्या टप्प्यात फारूक अब्दुल्ला रामभजन गाताना दिसत आहेत. (Farooq Abdullaha On Ram)

Farooq Abdullaha On Ram: 'मेरे राम, सुना-सुना आंगन मेरा…'

मुलाखती दरम्यान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी 'मेरे राम, मेरे राम… ' हे भजन गायले आहे. यावेळी ते रामभक्तीत तल्लीन झालेले दिसले. (Farooq Abdullaha On Ram)

लोकांना धर्म समजून घेण्याचे केले आवाहन

फारुख अब्दुल्ला यांनी लोकांना आपला धर्म समजून घेण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले, ज्या दिवशी तुम्हाला धर्म समजेल त्या दिवशी तुम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही. आज आपण संघटित होऊन देश कसा वाचवायचा याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. आपण एकजूट होऊ शकलो नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. (Farooq Abdullaha On Ram)

राम लोकांमध्ये भेदभाव करत नाही-अब्दुल्ला

व्हिडिओमधील मुलाखतीत खासदार कपिल सिब्बल यांनी फारुक यांना विचारले आहे की, तुमचाही भगवान रामावर विश्वास आहे का? यावर फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, त्यांचा रामासोबतच त्यांच्या आदर्शांवरही विश्वास आहे. दरम्यान कपिल सिब्बल आणि फारुख अब्दुल्ला यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अब्दुल्ला म्हणाले, हे लोक रामाबद्दल बोलतात, पण त्यांचा आदर्श मानत नाहीत. देव सर्वांचा आहे आणि आम्ही प्रभू रामावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्या आदर्शांवर चालत आहोत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

पाहा व्हिडिओ:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news