Latest

Nana Patole Criticism Of BJP | भाजप हा शेतकऱ्यांच्या मनातून संपलेला पक्ष : नाना पटोले

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस सरकारने कुठलाही अध्यादेश काढला तर त्याचा आता परिणाम होणार नाही. भाजप हा शेतकऱ्यांच्या मनामधून संपलेला पक्ष झाला आहे. त्यांना जिंकता येणार नाही असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमाशी बोलताना केला. (Nana Patole Criticism Of BJP)

पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजना म्हणजे लबाडाचं जेवण आहे, शेतकऱ्यांना मदत करायची असल्यास बियाणे, खत दर कमी करावे, जीएसटी कमी केला पाहिजे. बनियावृत्ती थांबवली पाहिजे, आज शेती खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांकडून जादा दराने पैसे घेऊन त्यांनाच वाटायचे हे शेतकऱ्यांना आता समजले आहे. जीएसटीतून लूट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळेच जनता आता सरकारच्या तुटपुंज्या घोषणांना बळी पडणार नाही. दुसरीकडे सर्वपक्ष आपापल्या पद्धतीने पक्ष वाढविण्यासाठी काम करीत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. (Nana Patole Criticism Of BJP)

भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचे प्लॅनिंग | Nana Patole Criticism Of BJP

लोकसभा आणि विधानसभा निहाय आढावा घेण्यात येणार आहे, भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचे काम प्लॅनिंगनुसारच आढावा घेण्यात येत आहे. सध्या रोज महापुरुषांच्या अपमान होत असल्याच्या घटना पहायला मिळत आहेत असे म्हणत भाजपवर आरोप केले. ते म्हणाले की,  सावित्रीबाई, अहिल्याबाई पुतळ्याला हटवण्यात आले, महिला कुस्तीपटू यांची अवस्था देश बघत आहे, महिलांचा अपमान केला जात आहे अशी माहिती देत पटोले यांनी भाजपवर आरोप केले आहेत.

भाजपची तानाशाही वृत्ती | Nana Patole Criticism Of BJP

भाजपची तानाशाही वृत्ती सुरू आहे. संसद उदघाटनाला देखील ती दिसली. देशाच्या संवैधानिक व्यवस्थेला वाचवणे हाच उद्देश कॉंग्रेसचा आहे, देशाला वाचवणं हा काँग्रेसचा संकल्प आहे. भाजप मत विभाजनाचे राजकारण अनेक वर्षांपासून करत आहे, त्यामुळे त्याला महत्व देण्याची गरज नाही. पुणे निवडणूक बाबत बोलताना पटोले म्हणाले, निवडणूक तर लागू द्या प्लॅन तयार आहे, एकत्रित बसून आम्ही निर्णय घेऊ. पुन्हा महागाई वाढत आहे, बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा आहे यावर भर दिला. दरम्यान, काँग्रेसचे खा बाळू धानोरकर यांचे निधन संपूर्ण विदर्भासाठी काँग्रेससाठी दुःखद आहे, लोकनेता जाण्याचे आम्हाला दुःख आहे. दिल्लीवरून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुकुल वासनिक यांना पाठवले. मुख्यमंत्री यांनीही यायला हवे, आपली ही संस्कृती आहे याकडे वरोरा येथे निघण्यापूर्वी बोलताना लक्ष वेधले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT