चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
बैल घेऊन शेतावर गेलेल्या एका शेतकर्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मूल तालुक्यातील मारोडा गावानजीकच्या जंगलात शनिवारी ही घटना उघडकीस आली. गजानन गुरनुले (60) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. गुरनुले नेहमीप्रमाणे गावाजवळच्या शेतात बैल चरावयास गेले होते. संध्याकाळच्या वेळीस गावात बैल आले. गुरनुले परत न आल्याने शोधाशोध करण्यात आली. डोंगराच्या पायथ्याशी गुरनूले यांचा मृतदेह सापडला.
हेही वाचा