Latest

Fake Call Centre : लोकांची खाती साफ करणार्‍या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; अमेरिकन तपास यंत्रणेकडून माहिती

अमृता चौगुले

कोलकाता; वृत्तसंस्था : डेटा स्पीड वाढवून परदेशात कर्ज देण्याच्या नावाखाली बनावट कॉल सेंटर उघडल्याप्रकरणी अहमदाबादच्या तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. चार कोटींची रोकड, रेंज रोव्हर डिफेंडर, एक किलो सोने, लॅपटॉप, आयफोन जप्त करण्यात आले असून अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयने दिलेल्या माहितीच्या आधारे पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कॉल सेंटरद्वारे लोकांची बँक खाती साफ करण्याचा गोरखधंदा सुरू होता. (Fake Call Centre)

हे युवक दर पाच मिनिटांनी एटीएममधून बॅग भरून गाडीत टाकत असल्याचे पाहून पोलिसांनाही संशय आला. हे तरुण हे अहमदाबाद येथून बनावट कॉल सेंटर चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यामुळे पश्चिम बंगाल पोलिस गुजरात पोलिसांच्या मदतीने तपास करणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा असल्याने अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तपास सोपविला जाणार आहे.
विधाननगर पोलिसांनी कालुपूर येथील मुफिज फियाज मणियार (वय 22), वेजलपूर येथील यासिर खान (वय 24), मनीष यादव (वय 24) यांना अटक केली. प्राथमिक चौकशीत हा घोटाळा अहमदाबादमधून चालवला जात असल्याचे निष्पन्न झाले. (Fake Call Centre)

एटीएस, ईडी, स्टेट मॉनिटरिंग सेलही तपासात (Fake Call Centre)

अहमदाबादपासून पश्चिम बंगालपर्यंत अनेक लोक गॅलेक्सी इन्फोलाईनच्या नावाने बनावट कॉल सेंटर घोटाळ्यात सामील असल्याचा संशय आहे. इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी आणि बिनव्याजी कर्ज देण्याचे आमिष दाखवून बँक खात्याचे तपशील मिळवले गेले. यानंतर ओटीपी पाठवले गेले आणि काही मिनिटांत बँक खाती साफ केली गेली. तपासासाठी एटीएस, ईडी आणि स्टेट मॉनिटरिंग सेलची मदत घेतली जाणार आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT