पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या फोटोचा व्हॉटस् ॲप प्रोफाईल म्हणून वापर करुन ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवक तसेच नागरिकांना फसवण्याचे प्रकार घडत आहेत. या अनुषंगाने महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी पोलीस खात्याशी संबंधित सायबर सेल कडे फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर याबाबत तक्रार नोंदविली आहे. (Pimpari Chinwad Municipal)
या तक्रारीत अज्ञात व्यक्तीने मोबाईलच्या 7524891151 या क्रमांकवरुन व्हॉटस् ॲपच्या माध्यमातून नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटींग करुन आर्थिक मदतीची विचारणा केली आहे.
तसेच 7977510080 या क्रमांकावरुनही व्हॉटस्अपच्या माध्यमातून अशाच प्रकारे आर्थिक मदतीची विचारणा केली जात आहे. तरी या पत्राद्वारे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि शहरवासियांना कळविण्यात येते की अशा प्रकारे होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी वरील क्रमांकावरुन अथवा अन्य क्रमांकावरुन फेक प्रोफाईल आयडीद्वारे कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास त्याबाबत पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये. (Pimpari Chinwad Municipal)अशा प्रकारे कोणतीही मागणी करण्यात येत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
हेही वाचलं का?