नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल-नोव्हेंबर) दरम्यान १७.४३ अब्ज डॉलर्सची निर्यात करीत १६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गतवर्षी याच कालावधीत निर्यात १५.०७ अब्ज डॉलर्स एवढी होती.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणार्या कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या नव्या योजनांमुळे चालू वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत एकूण निर्यात उद्दिष्टांच्या ७४ टक्के इतकी साध्य झाले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. कडधान्य आणि विविध प्रक्रियायुक्त अन्न उत्पादनांमध्ये मागील वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांच्या तुलनेत २८.२९ टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या आठ महिन्यांत डाळींच्या निर्यातीत ९०.४९ टक्के वाढ झाली आहे. प्रक्रियायुक्त फळे आणि भाज्यांनी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ३२.६० टक्के वाढ नोंदवली, ताज्या फळांनी मागील वर्षाच्या याच महिन्यांच्या तुलनेत चार टक्के वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
हेही वाचा :