प्रातिनिधक छायाचित्र 
Latest

कोरोनाचा सौम्‍य संसर्गही हृदयविकाराची शक्यता वाढवतो! : जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते ?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तीन वर्षांपूर्वी कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले. जनजीवन पूर्णपणे विस्‍कळीत करणार्‍या या महामारी आता पूर्णपणे आटोक्‍यात आल्‍याचे चित्र आहे. जगभरात झालेले लसीकरण आणि वाढलेली प्रतिकार शक्‍ती यामुळे कोरोनाचे भय संपले असे मानले जात आहे. कमी वयातील हृदयविकाराचा झटका, कोविड-19 आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण यांच्यातील संबंधांवर इंडियन कौन्‍सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर ) संशोधन सुरु केले आहे. ( Heart disease after COVID 19 )

कोविड-19 आणि हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमध्ये संबंध

यासंदर्भात 'इंडिया टूडे'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटले आहे की, कोरोना आणि कमी वयातील हृदयविकारचा त्रास याबाबत हृदयविकाराचे प्रोफेसर डॉ तरुण कुमार म्‍हणतात की, जीवनशैलीचे घटक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमध्ये मोठी भूमिका बजावतात. धुम्रपान आणि प्रदूषण हे त्याची प्रकृती वाढवणारे धोके आहेत, परंतु हृदयविकाराच्या सुरुवातीच्या काळात जीवनशैलीचे काही घटक देखील मोठी भूमिका बजावतात. तसेच काही रुग्‍णांना कोरोनाची सौम्‍य लक्षणं जाणवली होती.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केलेल्‍या संशौधनात हृदयविकाराचा झटका आणि कोरोना पुनर्प्राप्ती तसेच हृदयविकाराचा झटका आणि लसीकरण यांच्यातील दुवे शोधण्‍यात येत आहे, अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासांनी असे सुचवले आहे की, कोविड-19 आणि हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमध्ये निश्चित संबंध आहे. अगदी सौम्य कोविड-19 संसर्ग आणि बरे झालेल्यांनाही हृदयाशी संबंधित आजार किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या लवकर सुरू होण्याची शक्यता वाढत असल्‍याचा अंदाज आहे.

Heart disease after COVID 19 : आंतरराष्ट्रीय अभ्यास काय सांगताे ?

कोरोनाची लागण होवून गेलेल्‍या रुग्‍णांमध्‍ये हृदविकारची जोखमी वाढत का? यावर इटलीमध्‍ये संशोधन झाले. या संशोधनात असे म्‍हटले आहे की, सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत COVID-19 बरे झालेल्या रुग्णांमध्ये तीव्र हृदयविकाराचा धोका ९३ टक्क्यांनी जास्त होता.
कोविड-19 च्या दीर्घकालीन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी परिणामांचे मूल्यांकन करणार्‍या एका सर्वात मोठ्या अभ्यासानुसार, अगदी सौम्य आजार असलेल्यांनाही संसर्गानंतर एक वर्षानंतर हृदयविकाराचा धोका जास्त असतो, असे संशोधनात आढळल्‍याचा अभ्यास फेब्रुवारीमध्ये नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला होता.

जेव्हा संशोधकांनी विशेषतः सौम्य कोविड असलेल्या लोकांकडे पाहिले तेव्हा त्यांना असे आढळले की, या गटामध्ये समकालीन नियंत्रण गटाच्या तुलनेत हृदयविकाराचा त्रास होण्याचा धोका ३९ टक्के जास्त आहे किंवा १२ महिन्यांत एक हजार लोकांमागे 28 अतिरिक्त हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या आहेत.

यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) कोचीचे सदस्य डॉ. राजीव जयदेवन यांनी स्‍पष्‍ट केले आहे की,  "चांगल्या-संशोधित डेटाबेसवर आधारित हा एक मोठा अभ्यास होता. हे दर्शविते की जे लोक बरे झाले आहेत, विशेषत: ज्यांना कोरोनाचे एकपेक्षा अधिकवेळा लगण झाली त्‍यांना नंतर अधिक गंभीर परिणाम दिसू लागले. यामध्ये नंतर घडणाऱ्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांचा समावेश होतो.कोविडमधून बरे झालेले लोक आणि ज्यांना कोविडची लागण झाली नाही अशा लोकांच्या अनेक अभ्यासांमध्ये दोन्ही गटांमधील घटना दरामध्ये थोडासा पण लक्षणीय फरक दिसून आला आहे. हे धूम्रपानासारखेच आहे. यामुळे गंभीर चिंता निर्माण होते."

फक्त कोविडची लागण झाल्याने हृदयाशी संबंधित आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार वाढतात की नाही याबद्दल,"
ह्यूस्टनमधील DeBakey Heart & Vascular Center ने संशोधन केले. यामध्‍ये कोरोनाचे हृदयावरील दीर्घकालीन परिणाम दिसून आले. या अभ्यासात कोविडनंतर सुमारे सहा महिन्यांनी हृदयाच्या लहान वाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह बिघडल्याचे २७१ प्रकरणे आणि ८१५ नियंत्रणे, पीईटी स्कॅनद्वारे निर्धारित केल्याप्रमाणे आढळले.

लसपूर्व काळातील यूके बायोबँकवर आधारित अभ्यासामध्ये कोविडनंतर दीर्घकालीन मृत्यू आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी परिणाम दिसून आले. गंभीर प्रारंभिक कोविड नसलेल्यांना देखील धोका लागू होतो, असे निदर्शनास आले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT