पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक गुंतवणूक करताना नफा मिळवणे, आपल्या पैशाचे मूल्य सुरक्षित ठेवणे, नुकसान टाळणे अशी काही महत्त्वाची उद्दिष्टं असतात. बरेच गुंतवणुकदार शेअर बाजारात गुंतवणूक करताना भीती बाळगून असतात. समजा मार्केट कोसळले तर काय, अशी भीती त्यांच्या मनात असते; पण दुसरीकडे त्यांना हेही माहिती असते की शेअर बाजार इतका परतावा दुसऱ्या कोणत्याही गुंतवणुकीत मिळत नाही. अशा वेळी Equity Savings Schemes Fundsमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. Equity Savings Schemes Funds तुलनेत नवे आहेत. यातून बँकेतील ठेवींपेक्षा जास्त परतावा मिळतो आणि गुंतणूक केलेली रक्कम सुरक्षित राहाते.
या फंडमधील रक्कम इक्विटी फंड, डेट फंडस आणि आर्बिट्राज फंडमध्ये गुंतवली जाते. बाजारात जी अस्थिरता असते, किंवा जी जोखीम असते ती टाळणे हे या फंडचे उद्दिष्ट आहे. फंड मॅनेजर यातील ३० ते ३५ टक्के रक्कम इक्विटी अॅसेटमध्ये गुंतवतात, आणि उरलेली रक्कम डेट फंडस आणि आर्बिट्राज फंडमध्ये गुंतवली जाते. त्यामुळे रिस्क आणि रिवॉर्ड यांच्यात समतोल राखला जातो, शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या फंडमध्ये गुंतवणूक असल्याने परतावा जास्तीतजास्त मिळतो. पारंपरिक गुंतवणुकदारांसाठी Equity Savings Schemes Funds हा फार चांगला पर्याय मानला जातो. तसेच Equity Savings Schemes Funds मध्ये अल्प काळात चांगला परतावा मिळतो.
समजा एखाद्या गुंतवणुकदाराने सहा महिन्यांसाठी Equity Savings Schemes Fundsमध्ये गुंतवणूक केली आहे, पण शेअर बाजार घसरल्याने पोर्टफोलिओचे मूल्य १० टक्क्यांनी घसरले. अशा वेळी Equity Savings Schemes Fundsमधील जवळपास ६० टक्के रक्कम ही आर्बिट्राज आणि डेट फंडमध्ये गुंतवलेले आहेत, ते अनुक्रमे ६.५ टक्के आणि ६ टक्के इतका परतावा देतील. म्हणजेच शेअर बाजारात जे नुकसान झाले आहे, ते येथून भरून निघेल.
Equity Savings Schemes Funds हा इक्विटी असेट मानला जातो, त्यामुळे इक्विटी ॲसेटवरील करांचे नियम या फंडलाही लागू आहेत.
ज्या गुंतवणुकदारांना कमी काळासाठी पैसे गुंतवायचे आहेत आणि शेअर मार्केटसाठी एक्सपोजर हवे आहे, अशांसाठी हा फंड चांगला आहे. सर्वसाधारणपणे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी पैसे गुंतवायचे असतील तर हा फंड बँक 'एफडी'पेक्षा फार चांगला पर्याय आहे.
हेही वाचा