Latest

गडाच्या घेऱ्यातील जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात : संभाजीराजे छत्रपती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज बोरडे कुटुंबियांनी किल्ले विसापूर आणि लोहगड किल्ल्यांना दिलेल्या भेटी दरम्यान आपुलकीने आमचे आदरातिथ्य केले. सकाळी विसापूर किल्ल्याच्या चढाईसाठी गडपाथ्याला येताच तिथे बोरडे कुटुंबियांना आमच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था सांगून गडावर गेलो.

गड पाहून दुपारी बोरडे यांच्या अंगणातील रम्य झाडीत बसून जेवण केले. अत्यंत आपुलकीने केलेले अस्सल गावरान पद्धतीच्या जेवणाने मन अगदी तृप्त झाले. यानंतर किल्ले विसापूरला लागून असलेल्या लोहगडची चढाई करण्यासाठी सज्ज झालो.

अमोल बोरडे आणि कुटुंबीय हे इथले स्थानिक रहिवासी आहेत. गडपायथ्याला ते घरगुती भोजनगृह चालवितात. गड पहायला येणाऱ्या शिवभक्तांना, पर्यटकांना पोटभर जेऊ घालणे, हेच त्यांच्या उपजीवीकेचे साधन! पर्यटकांना गडाबरोबरच इथल्या स्थानिकांच्या हातची चव आणि त्यांची आत्मियता देखील अनुभवायला मिळते.

फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन चळवळ राबविताना गडकोटांच्या जतन संवर्धनाबरोबरच गडाच्या घेऱ्यातील जनतेला स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे राहणीमान उंचावले जावे, यासाठी माझे प्रयत्न आहेत. गडकोटांच्या घेऱ्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्धता आणि इतिहास प्रेमी, दुर्गप्रेमींची व पर्यटकांना मुलभूत सुविधा हा दुहेरी हेतू साध्य करण्यासाठी फोर्ट फेडरेशनच्या वतीने निश्चितच प्रयत्न केले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT