पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, ट्विटर या सोशल मीडिया कंपनीच्या भवितव्याबद्दल त्यांना फारशी चिंता नाही कारण कंपनीसोबत सर्वोत्तम लोक आहेत. खरं तर मस्कने दिलेल्या मुदतीनंतर शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे. पुढील काही दिवस कार्यालयीन इमारती बंद ठेवत असल्याच्या सुचना ट्विटरने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली होती. (Elon Musk React About Twitter)
ट्विटरच्या एका वापरकर्त्याने मस्क यांना ट्विट करून विचारले होते की, "जेव्हा लोक म्हणतात की ट्विटर बंद होणार आहे, तेव्हा याचा काय अर्थ होतो?" या प्रश्नाला उत्तर देत मस्क यांनी ट्विट केले की, "ट्विटरमध्ये सर्वोत्तम लोक कार्यरत आहेत आणि मला याची विशेष काळजी वाटत नाही. (Elon Musk React About Twitter)
न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ट्विटर सोडायचे की कंपनीसोबत राहायचे हे ठरवण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. यानंतर शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनीला निरोप देत, तीन महिन्यांची नुकसानभरपाई घेण्याचा निर्णय घेतला. (Elon Musk React About Twitter)
असे सांगण्यात आले की ट्विटरने ईमेलद्वारे सर्वांना सांगितले की, सोमवारपर्यंत कार्यालयीन इमारती बंद ठेवण्यात येतील आणि या ठिकाणी कर्मचार्यांना प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडू नये यासाठी मस्क आणि त्यांचे सल्लागार वारंवार बैठक घेत आहेत.
अधिक वाचा :