Latest

Elon Musk on Wikipedia : एलन मस्कचा ‘Meta’ नंतर ‘Wikipedia’शी पंगा; दिली ‘ही’ ऑफर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे त्यांच्या निर्णय आणि विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी मेटाने 'थ्रेड्स' ॲप सुरू केले होते. मस्क यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यांशी पंगा घेत, ट्विटरमध्ये बदल केले. या घटनेनंतर आता एलन मस्क यांनी ' Wikipedia'शी देखील पंगा घेत, एक अब्ज डॉलरची ऑफर दिली आहे. (Elon Musk on Wikipedia)

'विकिपीडिया'ने नाव बदलून 'डिकीपीडिया' करावे

अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर पूर्णपणे विकत घेतले. तेव्हापासून ते नवनवीन बदल करत आहेत. मस्क यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे नाव बदलून 'X' केले होते. त्यानंतर मस्क यांनी आता 'विकिपीडिया'लाच चॅलेंज दिले आहे. मस्क यांनी यासंदर्भातील पोस्ट त्यांच्या 'X' अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, " 'विकिपीडिया'ने त्यांचे नाव बदलून 'डिकीपीडिया' केले तर मी त्यांना एक अब्ज डॉलर देईन" असे म्हटले आहे. (Elon Musk on Wikipedia)

तुम्ही तुमचे नाव बदलून घ्या :  नेटकऱ्यांनी सुनावले

दरम्यान एक्स सीईओ 'एलन मस्क' यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये विकिपीडियाच्या होमपेजचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये अमेरिकन उद्योगपती व विकिपीडियाचे सह-संस्थापक जिमी वेल्स यांनी विकिपीडिया विक्रीसाठी नाही, असे म्हटले आहे. मस्क यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील यावर खाेचक प्रतिक्रिया दिल्‍या आहेत. मस्क यांनी विकिपीडियाला दिलेल्या चॅलेंजची पोस्टवर ' पैसे मिळताच तुम्ही तुमचे नाव बदलून घ्या.', असे एका नेटकऱ्यांनी म्हटले आहे. (Elon Musk on Wikipedia)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT