Latest

Sangli Gram Panchayat Election Result 2022 : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आई झाल्या सरपंच

अविनाश सुतार

सांगली : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्या आहेत. पडळकरवाडी ग्रामपंचायतीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे. ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर पडळकर समर्थक सदस्यांनी गुलाल उधळला आहे. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या ३०० मतांनी निवडून आल्या आहेत.

जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत आलेल्या निकालामध्ये राष्ट्रवादीला २१ ठिकाणी यश मिळाले आहे. २१ ठिकाणच्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तसेच शिंदे गटाला १४, भाजप १२, काँग्रेस ६ तर इतर ६ ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी मोठ्या चुरशीने सुरू आहे. त्यामध्ये सध्या तरी राष्ट्रवादीने आघाडी घेतलेली दिसत आहे.

जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील ३६, तासगाव तालुक्यातील २६, कवठेमहांकाळ तालुक्यातील २८, जतमधील ८१, खानापूरमधील ४५, आटपाडीतील २५, पलूसमधील १५, कडेगावमधील ४३, वाळव्यातील ८८ व शिराळ्यातील ६० ग्रामपंचायतींचा सहभाग आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच आणि सदस्यपदांच्या ४७१६ जागांसाठी तब्बल १६ हजार ६५ उमेदवारांचे १६ हजार ४४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सरपंचपदाच्या ४४७ जागा आहेत. सरपंचपदाच्या जागेसाठी २ हजार ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी ३८ गावच्या कारभार्‍यांची बिनविरोध निवड झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT