पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कोरोनाचे संकट लक्षात घेऊन घालण्यात आलेल्या निर्बंधात केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission) काही प्रमाणात सूट दिली आहे. आता जाहीर सभांसाठी पाचशे लोक उपस्थित राहण्याची मर्यादा आता एक हजारपर्यंत वाढविण्यात आली आहे.
घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या प्रचारासाठी असलेली मर्यादा 10 लोकांवरून 20 लोकांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर इनडोअर बैठकांसाठी 300 ऐवजी 500 लोक हजर राहू शकतात, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाचे संकट पाहून निवडणूक आयोगाने प्रचारावर विविध बंधने घातली होती. 22 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत हे प्रतिबंध 31 जानेवारीपर्यावरण वाढविण्यात आले होते. त्यात आता काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. ( Election Commission)
28 जानेवारीला झालेल्या बैठकीवेळी आयोगाने जाहीर सभा घेण्यास राजकीय पक्षांना परवानगी दिली होती. मात्र त्यासाठी कमाल 500 लोक हजर राहण्याची अट घातली होती. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या मतदान तारखा जाहीर झाल्या असून उत्तर प्रदेशात सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्प्यात तर उर्वरित तीन राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.