मुंबई ; पुढारी वृत्तसेवा
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे आणि मला उपमुख्यमंत्रीपद द्यावे, तरच आपला गट शिवसेनेत राहील, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे, माजी मंत्री संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेत शिंदे यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.
कृषी मंत्री दादाजी भुसे, माजी मंत्री संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांचा हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या कळविला आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. शिंदे यांचा हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी मान्य केला तर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागेल. तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीसोबतचे संबंध तोडावे लागणार आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता कमी आहे. स्वतः एकनाथ शिंदे समोर येऊन कोणती भूमिका मांडतात याबाबत उत्सुकता आहे.
हेही वाचा :