kitchen kallakar show  
Latest

चक्क किरीट सोमय्या-खडसेंनी मांडली एकत्र ‘चूल’, एकमेकांची कडकडून घेतली गळाभेट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

किचन कल्लाकारमध्ये महाराजांसाठी राजकीय मेजवानी देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी किचन कल्लाकारच्या किचनमध्ये उपस्थिती लावली. छोट्या वाहिनीवरील किचन कलाकार या कार्यक्रमात हे दोन नेते हजेरी लावणार आहेत. आतापर्यंत अनेक कलाकारांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या किचनमध्ये कल्ला केला आहे.

kitchen kallakar show

नुकताच या कार्यक्रमात राजकीय धुरळा पाहायला मिळाला. आता किचन कल्लाकारच्या आगामी भागात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे प्रेक्षकांच्या भेटीस येतील. त्याची झलक सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

व्हिडिओमध्ये यामध्ये व्हिडिओमध्ये एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे राजकीय मैदानात नेहमी एकमेकांवर आरोप करणारे हे चेहरे या मंचावर मात्र एकमेकांची कडकडून गळाभेट घेताना दिसले. राजकीय मैदानातील हे स्पर्धक या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले व यानिमित्त त्यांनी किचनमध्ये जोरदार कल्ला केला. राजकारणात कल्ला करणारे हे नेते किचनमध्ये पदार्थ बनवून महाराजांना खुश करू शकतील का हे पाहणे औस्त्युक्याचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT