Latest

Fraud Job : पार्ट टाईम नोकरी देणाऱ्या चीनी कंपनीवर ईडीची कारवाई

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : ईडीने सोमवारी बंगळूर येथे चीनमधील व्यक्तींमार्फत चालवले जाणाऱ्या पार्ट टाईम नोकरी (Fraud Job) देणाऱ्या बनावट कंपनीवर कारवाई केली. जवळपास १२ ठिकाणांवर छापेमारी करून बोगस संस्था सील करण्यात आल्या. एकूण ५.८५ कोटींचा घोटाळा या संस्थेने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबतच्या अधिक तपासानंतर, बंगळूर येथील तरूणांना काही चीनी लोकांनी मोबााईल अॅपद्वारे काम देण्याचे आश्वासन देऊन फसवल्याची घटना घडली. किपशेअर असे या अॅपचे नाव आहे. या अॅपद्वारे पार्ट टाईम नोकरीतून पैसे कमाविण्याचे अमिष दिले जात होते. यासाठी तरूणांकडून पैसे गोळा केले जात होते. (Fraud Job)

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन भारतीय तरूणांचे बँकेत खाते उघडले जात होते. त्यानंतर या चिनी व्यक्तींनी "कीपशेअर" या नावाने मोबाईल अॅप विकसित केले. यातून तरुणांना अर्धवेळ नोकरीची संधी देण्याची जाहीरात सुरू केली. व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून त्याची जाहिरात दिली.

हे अॅप एका गुंतवणूक अॅपशी जोडलेले होते. या अॅपवर नोंदणीसाठी तरुणांकडून पैसे वसूल करण्यात आले. याशिवाय या अॅपद्वारे गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांकडून पैसेही गोळा केले. सेलिब्रिटींचे व्हिडिओ लाईक करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचे काम तरुणांना देण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर ते प्रति व्हिडिओ २० रुपये प्रमाणे पैसे देत होते. हे पैसे 'कीपशेअर' वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. काही काळ हे पैसे जमा झाले मात्र तरूणांच्या वॉलेटमध्ये पैसे जमा झाले नाही. पण नंतर ते अॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT