नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याने केलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला देखील आरोपी बनविले आहे. ईडीने आरोपपत्रात जॅकलिनच्या नावाचा समावेश केला असून लवकरच तिला अटक होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. न्यायालयाने याआधीच जॅकलिनला देश सोडून कुठेही जाऊ नये, असे निर्देश दिलेले आहेत.
सुकेश चंद्रशेखर गुन्हेगार असल्याचे जॅकलिनला माहित होते आणि लुटीच्या पैशाचा तिला फायदा झाल्याचे ईडीचे आरोपपत्रात नमूद केले असल्याचे समजते. दिल्लीतील तिहार तसेच इतर तुरुंगात बसून सुकेश चंद्रशेखर आपले वसुलीचे रॅकेट चालवित होता. सदर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिची ईडीकडून अनेकदा चौकशी झाली आहे. सुकेशने जॅकलिनला सुमारे दहा कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. दुसरीकडे सुकेशवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये 32 गुन्हे दाखल आहेत. ईडी, सीबीआय, आयकर खात्याकडून सुकेशची विविध घोटाळ्यांच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.
हेही वाचा :